विशेष प्रतिनिधी, कोकणधारा
देवरुख: चिपळूण येथील बलशाली युवा हृदय मंचच्या वतीने हातिव पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य मंगेश बांडागळे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी बलशाली युवा हृदय मंचचे अध्यक्ष तथा चिपळूण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री. शिरीषशेठ काटकर, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश उर्फ बाबू तांबे, माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष मिलिंदशेठ कापडी, चिपळूण नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर व गुहागर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी अनंत मोरे, निवृत्त शिक्षक विकास ढवण, व्यावसायिक निहार वैद्य, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सचिन पाटेकर, मुरादपूरचे फौजदार बळीराम बांडागळे आदी उपस्थित होते.
बलशाली युवा हृदय मंचाच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देऊन मंगेश बांडागळे यांचा त्यांच्या निवासस्थानी गौरव करण्यात आला. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत व्यवसाय आणि राजकारण क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. आगामी काळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत विकासकामांना प्राधान्य द्यावे, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.















