konkandhara.com

  • Home
  • क्रिडा
  • डेरवण यूथ गेम्स 2026: अद्विका सोनीची 5 सुवर्णपदके
डेरवण यूथ गेम्स 2026: अद्विका सोनीची 5 सुवर्णपदके

डेरवण यूथ गेम्स 2026: अद्विका सोनीची 5 सुवर्णपदके

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा

चिपळूण : डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून यंदाच्या डेरवण यूथ गेम्समधील जलतरण स्पर्धेत पुणेच्या ब्ल्यू वॉटर स्पोर्ट्स अकॅडमीच्या अद्विका सोनी हीने ५ तर अर्जुन नाईक याने चार सुवर्णपदके पटकावली आहेत. तर रत्नागिरीच्या निधी भिडे हिने एक सुवर्ण,तीन रौप्य व एक कांस्य पदकाची तर अमोल पखाले याने दोन रौप्य व दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे.

विशेष म्हणजे जलतरण स्पर्धेत मोठ्या संख्येने विविध ठिकाणच्या स्पर्धकांनी फ्री स्टाईल, वैयक्तिक मिडले, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय, बॅक स्ट्रोक व मिक्स्ड फ्री स्टाईल रिले या पाच प्रकारातील प्रत्येकी पाच उपप्रकारामध्ये सहभाग नोंदवून शानदार प्रदर्शन केले.

पुण्याच्या ब्ल्यू वॉटर स्पोर्ट्स अकॅडमीची अद्विका सोनी हिने या स्पर्धेमध्ये ५ सुवर्णपदके मिळविताना १२ वर्षांखालील गटातील १०० मिटर फ्री स्टाईल, १०० व २०० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर बॅक स्ट्रोक व ४×५० मीटर मिक्स्ड फ्री स्टाईल रिले या सर्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच रत्नागिरीच्या महेश मिल्के स्विमिंग ग्रुपच्या निधी भिडे हिने एक सुवर्ण,एक कांस्य व तीन रौप्य पदकांची तर रत्नागिरीच्याच अ‍ॅक्वाटेक्निक्सच्या क्रिशांग अमोल पखाले याने दोन कांस्य व दोन रौप्यपदकांची कमाई केली असून ४×५० मिक्स्ड फ्री स्टाईल रिले प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.

यंदाच्या या स्पर्धेत ब्ल्यू वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी, चॅम्पियन अ‍ॅक्वॅटिक क्लब, हार्मनी अ‍ॅक्वॅटिक क्लब, मेट्रोसिटी क्लब, स्विफ्ट फिन्स्विम क्लब, सिंबायोसिस स्कूल या बहुतांश पुण्याच्याच क्लब्सनी सहभाग घेतला होता, तसेच कोल्हापूरचा शांतिनिकेतन स्विम व पीजीटी, जयसिंगपूरचा जे. एम. सी. क्लब, रत्नागिरीचा महेश मिल्के स्विमिंग ग्रुप व अ‍ॅक्वॅटेक्निक्स, रायगडचा जे.एम.राठी स्विम क्लब, सिंधुदुर्गचा माँ व डॉन बॉस्को हायस्कूल व ज्यु. कॉलेज, ठाण्याचा स्टारफिश स्पोर्ट्स फाऊंडेशन, मिरजची तासगावे जलतरण संस्था आणि मुंबईचे छत्रपती शिवाजीमहाराज स्मारक समिती आणि सी.एस.एम.एस.एस.

या सर्व क्लबमधील खेळाडूंनी सहभाग नोंदवत शानदार प्रदर्शन केले. तसेच १६ वर्षांखालील मिक्स्ड ४×५० मिटर रिले स्पर्धेत ब्ल्यू वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणे प्रथम, हार्मनी अ‍ॅक्वॅटिक क्लब (अ) द्वितीय व मिरजची तासगावे जलतरण संस्था यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

तर १२ वर्षांखालील मिक्स्ड ४×५० मिटर रिले स्पर्धेत ब्ल्यू वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणे प्रथम, रत्नागिरीची अ‍ॅक्वॅटेकनिक्स द्वितीय व मिरजची तासगावे जलतरण संस्था यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

Releated Posts

विकासाच्या राजकारणाला प्राधान्य; चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश

चिपळूण | योगेश बांडागळे (प्रतिनिधी): चिपळूणमध्ये माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. राधाताई लाड…

ByByEditorial मार्च 1, 2026

श्रीराम महादेववाडीतील चिमुकल्यांनी भरवले अंडर-14 क्रिकेट सामने

महादेववाडी | कोंकणधारा डेस्क:श्रीराम महादेववाडी येथे चिमुकल्यांनी आयोजित केलेल्या १४ वर्षांखालील वयोगटातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडून सामने…

ByByEditorial फरवरी 7, 2026

अमरावती महापालिकेत त्रिशंकू निकाल; भाजप आघाडीवर

अमरावती | १६ जानेवारी २०२६ :अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली…

ByByEditorial जनवरी 17, 2026

भारताचा क्लीन स्वीप; 2025 ला विजयी निरोप देणारी हरमनप्रीतची टीम

तिरुवनंतपुरम | 30 डिसेंबर 2025:तिरुवनंतपुरमच्या संध्याकाळी क्रिकेट मैदानावर जेव्हा शेवटचा चेंडू टाकला गेला, तेव्हा तो केवळ एका सामन्याचा…

ByByEditorial दिसम्बर 30, 2025
Image Not Found
Image Not Found

Gallery

पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार! अडूर गावात शिमगोत्सव उत्साहात
बलशाली युवा हृदय मंचकडून मंगेश बांडागळे यांचा सत्कार
chiplun-nagarsevak-chalak-marhan
मध्यपूर्व तणाव : भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन व सूचना
शिरोडा वेळागर येथे भव्य स्वच्छता अभियान उत्साहात
चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश
श्री सदस्यांचे कार्य समाजासाठी आदर्श : उमेश सकपाळ
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील अनधिकृत धार्मिक फलक प्रशासनाने काढले; निवेदनानंतर तात्काळ कारवाई.
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद