konkandhara.com

  • Home
  • बातमी
  • व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया
commercial-gas-shortage-hostel-pg-hotel-business-impact

व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी : कोकणधारा

मुंबई : बाजारात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉस्टेल्स, पेइंग गेस्ट (PG) व्यवस्था आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. स्वयंपाकासाठी आवश्यक असणारा गॅस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना तसेच कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की अनेक हॉस्टेल्स आणि पीजी व्यवस्थापकांनी तात्पुरते बंद करण्याचा विचारही सुरू केला आहे.

गॅस टंचाईचा परिणाम हॉटेल व्यवसायावरही मोठ्या प्रमाणात जाणवत असून अनेक ठिकाणी स्वयंपाकघर चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि ग्राहक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, या परिस्थितीवर अभिनेता हेमंत ढोमे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आज व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे अनेक हॉस्टेल्स आणि पीजी व्यवस्थांवर मोठा परिणाम होत आहे.

विद्यार्थ्यांना आणि बाहेरगावी राहणाऱ्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती आपल्याला एका मोठ्या वास्तवाची जाणीव करून देते की, युद्धं आता फक्त बातम्यांमधील घटना राहिलेली नाहीत. त्याचे परिणाम थेट आपल्या दैनंदिन आयुष्यावर दिसू लागले आहेत.”

ते पुढे म्हणाले की, जगात कुठेही संघर्ष किंवा युद्ध झाले तरी त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर आणि सामान्य लोकांच्या जीवनावर होतो. “युद्ध ही दूर घडणारी घटना नसून त्याचे पडसाद आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे कुठलेही युद्ध हे वाईटच,” असेही त्यांनी नमूद केले.

सध्या गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हॉस्टेल चालक, पीजी व्यवस्थापक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून होत आहे.

Releated Posts

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून,…

ByByEditorial मार्च 23, 2026

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी अनिरुद्ध…

ByByEditorial मार्च 23, 2026

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये २७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली…

ByByEditorial मार्च 13, 2026

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात

विशेष प्रतिनिधी : कोकणधारा रायगड : “आज महाराष्ट्रात हजारो लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्य व्हायचे आहे. फक्त सदस्य…

ByByEditorial मार्च 9, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले
सुभाषराव चव्हाण यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर
रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित
चोरीची इको कार २४ तासांत शोधली; दापोली-शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई
खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; राष्ट्रवादीसमोर संघटनात्मक आव्हान
मंगेश पेढाबंकर यांना ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्कार जाहीर