konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम, १०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार
चिपळूण पाग परिसरात उड्डाणपूल; १०७.७८ कोटींच्या प्रकल्पासाठी नारायण राणे पुढाकार

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम, १०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ व पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. वाढती लोकसंख्या, अवजड वाहनांची वर्दळ आणि शहरांतर्गत वाहतुकीचा ताण लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १०७ कोटी ७८ लाख रुपयांच्या वाढीव उड्डाणपुलाचा (Elevated Structure) प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे.

तहसील कार्यालय ते ‘पाग’ या दरम्यान उड्डाणपुलाची लांबी वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. या भागात एसटी बसेस व अवजड वाहनांमुळे अनेक गंभीर अपघात घडले असून, वाहतूक कोंडीचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी १८ जून २०२५ रोजी १०७.७८ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार केला. त्यानंतर २२ जुलै २०२५ रोजी कार्यकारी अभियंत्यांकडून हा प्रस्ताव अधीक्षक अभियंत्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, वार्षिक आराखड्यात या कामाचा समावेश करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

या प्रकल्पाची निकड लक्षात घेऊन खासदार नारायण राणे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. चिपळूणमधील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची गंभीरता त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे शहरातील स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक यांचे विभाजन होऊन अपघातांमध्ये मोठी घट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या कामासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनीही पाठपुरावा केला आहे.

खासदार राणे यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. साखळी क्रमांक ५१+५५० ते ५२+६२० दरम्यान प्रस्तावित असलेल्या या उड्डाणपुलामुळे चिपळूणच्या वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.
सध्या या प्रस्तावावर पुढील प्रशासकीय कार्यवाही अपेक्षित असून, केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे हा प्रकल्प लवकर मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Releated Posts

मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित! निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात

चिपळूण : पेठमाप परिसरात आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने एकच खळबळ उडाली. अचानक…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर 18 चाकी गाडी बेदरकारपणे चालवून अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात जयगड…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधीमुलगा आणि सूनेचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला सुनेने शिवीगाळ व दमदाटी करत कपाळावर आणि हाताच्या…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५…

ByByEditorial अप्रैल 4, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले