konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा ठेकेदारांशी संवाद; दर्जेदार कामांवर भर
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा ठेकेदारांशी संवाद; दर्जेदार कामांवर भर

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा ठेकेदारांशी संवाद; दर्जेदार कामांवर भर

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी सोमवारी सायंकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे नगरपालिकेत काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांची बैठक घेतली. या बैठकीत ठेकेदारांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा सत्कार करून विविध समस्या व प्रश्न मांडले. नगराध्यक्षांनीही ठेकेदारांच्या अडचणी जाणून घेत संवाद साधला.

या वेळी बोलताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ म्हणाले की, चिपळूण शहराला आकार देण्याचे महत्त्वाचे काम ठेकेदार बंधू करत असतात. त्यामुळे सर्वांनी उत्तम नियोजन करून दर्जेदार कामे करावीत. चिपळूण शहर स्मार्ट सिटी बनवण्याचे माझे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्व ठेकेदारांचे सहकार्य आवश्यक आहे.

या बैठकीला साठहून अधिक ठेकेदार उपस्थित होते. तसेच बांधकाम सभापती कपिल शिर्के, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, नगरसेवक योगेश पवार, मुख्याधिकारी संजय जाधव, बांधकाम विभागाचे श्री. डफळ, श्री. निंबाळकर, सचिन शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ठेकेदार सुरेश चिपळूणकर, सुरेश पवार, किसन चिपळूणकर व अभिजीत जाधव यांच्या वतीने नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विविध विषयांवर साधक-बाधक चर्चा झाली. सर्व ठेकेदारांनी नगर पालिकेला सहकार्य करण्याची भूमिका घेत चिपळूण शहराच्या विकासासाठी दर्जेदार कामे करण्याची ग्वाही दिली.

Releated Posts

मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित! निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात

चिपळूण : पेठमाप परिसरात आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने एकच खळबळ उडाली. अचानक…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर 18 चाकी गाडी बेदरकारपणे चालवून अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात जयगड…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधीमुलगा आणि सूनेचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला सुनेने शिवीगाळ व दमदाटी करत कपाळावर आणि हाताच्या…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५…

ByByEditorial अप्रैल 4, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले