konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • चिपळूणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मिनी थिएटरही उभारू – पालकमंत्री उदय सामंत
चिपळूणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मिनी थिएटरही उभारू – पालकमंत्री उदय सामंत

चिपळूणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मिनी थिएटरही उभारू – पालकमंत्री उदय सामंत

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण व इतर विकास कामांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. चिपळूण शहरावर माझे विशेष प्रेम आहे. नगराध्यक्ष उमेश सकपाळ जेवढा निधी मागतील तेवढा देऊ, शहराच्या विकासासाठी एकही रुपया कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.

चिपळूण नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांसह रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन शनिवारी सायंकाळी पेठमाप येथे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या वेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी चिपळूणमध्ये रत्नागिरीप्रमाणे सुमारे २०० आसन क्षमतेचे मिनी थिएटर उभारण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री सामंत यांनी चिपळूणमध्ये मिनी थिएटर उभारले जाईल, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, हा कार्यक्रम दोन वेळा पुढे ढकलावा लागला. मात्र शहरासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या पालकमंत्र्यांच्याच हस्ते भूमिपूजन व्हावे, हा आमचा आग्रह होता. मराठी भाषा दिनानिमित्त होणाऱ्या साहित्यिक सन्मान सोहळ्यासाठीही त्यांची उपस्थिती असावी, अशी नगर परिषदेची इच्छा होती.

पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून शहराच्या विकासासाठी ते निधी कमी पडू देणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नगर परिषदेने सादर केलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, उपनगराध्यक्ष प्रा. रूपाली दांडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, मुख्याधिकारी संजय जाधव, बांधकाम सभापती कपिल शिर्के, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, शिक्षण समिती सभापती हर्षाली पवार, शिवसेनेचे नगर पालिकेतील गटनेते अंकुश आवले यांच्यासह शिवसेना-भाजपचे नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले.

दरम्यान मराठी भाषा दिनानिमित्त चिपळूण नगर परिषद, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यवाचन स्पर्धेचे बक्षीस वितरण, तसेच ज्येष्ठ साहित्यिकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

चिपळूणमधील साहित्य चळवळीला चालना देणाऱ्या साहित्यिकांचा यावेळी मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये प्रा. सुहास बारटक्के, अरुण इंगवले, प्रा. संतोष गोणबरे, मुजफ्फर सय्यद, डॉ. प्रशांत पटवर्धन, राष्ट्रपाल सावंत, धनंजय चितळे, प्रकाश (आप्पा) जाधव, रवींद्र गुरव, धीरज वाटेकर यांचा समावेश होता.

काव्यवाचन स्पर्धेतील विजेते
काव्यवाचन स्पर्धेत प्रदीप मोहिते (प्रथम), पल्लवी भावे (द्वितीय), विशाखा चितळे (तृतीय), कुमार कोवळे व संदेश पवार (उत्तेजनार्थ) यांनी यश मिळवले. त्यांनाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमामुळे शहरातील विकास कामांचा शुभारंभ होत असतानाच साहित्यिकांचा गौरव आणि काव्यवाचन स्पर्धेच्या माध्यमातून चिपळूणच्या सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याचे वातावरण निर्माण झाले.

Releated Posts

मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित! निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात

चिपळूण : पेठमाप परिसरात आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने एकच खळबळ उडाली. अचानक…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर 18 चाकी गाडी बेदरकारपणे चालवून अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात जयगड…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधीमुलगा आणि सूनेचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला सुनेने शिवीगाळ व दमदाटी करत कपाळावर आणि हाताच्या…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५…

ByByEditorial अप्रैल 4, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले