रत्नागिरीत बांबू परिषद आणि शेतकरी मेळावा; १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प
रत्नागिरी | आज रत्नागिरीतील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात बांबू परिषद व शेतकरी मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. या वेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, “बांबू ही फक्त एक पिकाची संकल्पना नसून, उत्पन्न वाढवण्याचा आणि नवे उद्योग निर्माण करण्याचा क्रांतिकारी मार्ग आहे.” 👉 येत्या १७ सप्टेंबरला राज्य सरकार महाराष्ट्राची पहिली बांबू पॉलिसी जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.👉 योग्य नियोजन व शेतकऱ्यांच्या सहभागाने बांबू लागवडीतून प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा ₹३०,००० ते ₹४०,००० अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.👉 रत्नागिरी जिल्ह्यात किमान १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.👉 बांबूपासून फर्निचर, ज्वेलरी, कापड, शूज, मेथेनॉल अशा विविध उद्योगांना चालना मिळू शकते.👉 विमानतळ टर्मिनल बिल्डिंगमधील ५०% फर्निचर बांबूपासून तयार करण्यात येणार आहे, हे कोकणासाठी अभिमानाचे पाऊल असल्याचेही सामंत यांनी सांगितले. “ही परिषद फक्त चर्चा नसून, शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवा आर्थिक आधार देणारी चळवळ आहे. रत्नागिरी महाराष्ट्रातील सर्वात मोठा बांबू लागवड करणारा जिल्हा बनणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी मंडळाध्यक्ष पाशाभाई पटेल, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.
रत्नागिरीत बांबू परिषद आणि शेतकरी मेळावा; १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प Read More »