konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • भोस्ते घाटात कंटेनर दरीत कोसळला; चालक गंभीर जखमी, मुंबई–गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर भीषण अपघात
Image

भोस्ते घाटात कंटेनर दरीत कोसळला; चालक गंभीर जखमी, मुंबई–गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर भीषण अपघात

प्रतिनिधी : कोकणधारा

खेड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात सोमवारी (९ मार्च) दुपारी भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला कंटेनर नियंत्रण सुटून महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सोमवार दि. ९ मार्च रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. गोव्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर भोस्ते घाटातील धोकादायक वळणावर आला असता अचानक नियंत्रण सुटल्याने तो थेट दरीत कोसळला. अपघाताची तीव्रता इतकी होती की कंटेनरचे चेसिस एका बाजूला तर लोखंडी सांगाडा सुमारे दीडशे फूटांहून अधिक खोल दरीत जाऊन पडला.

दरम्यान, भोस्ते घाटातील ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे त्या परिसराला राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने यापूर्वीच ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित केले आहे. या भागात वारंवार अपघात होत असल्याने अपघात रोखण्यासाठी घाटाच्या बाजूला मजबूत संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू आहे.
मात्र, तरीही या घाटात अपघातांचे सत्र सुरूच असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले असून जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Releated Posts

मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित! निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात

चिपळूण : पेठमाप परिसरात आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने एकच खळबळ उडाली. अचानक…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर 18 चाकी गाडी बेदरकारपणे चालवून अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात जयगड…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधीमुलगा आणि सूनेचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला सुनेने शिवीगाळ व दमदाटी करत कपाळावर आणि हाताच्या…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५…

ByByEditorial अप्रैल 4, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले