konkandhara.com

  • Home
  • Uncategorized
  • ऑटोरिक्षा परवान्यासाठी खोटे कागदपत्र सादर केल्यास परवाना निलंबनाची कारवाई – आरटीओ
ऑटोरिक्षा परवान्यासाठी खोटे कागदपत्र सादर केल्यास कारवाई

ऑटोरिक्षा परवान्यासाठी खोटे कागदपत्र सादर केल्यास परवाना निलंबनाची कारवाई – आरटीओ

प्रतिनिधी : कोकणधारा

रत्नागिरी, दि. १६ (जिमाका) : ऑटोरिक्षा परवाना मिळवताना खोटे कागदपत्र सादर केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कारवाईही करण्यात येईल, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात शासकीय धोरणानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत तीनचाकी, तीन आसनी ऑटोरिक्षा परवाने (परमिट) जारी केले जातात. या परवान्यासाठी अर्जदार सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपनी किंवा संघटित क्षेत्रातील कोणत्याही संस्थेत अथवा उद्योगात नोकरी करत नसावा, अशी अट आहे. यासाठी ऑटोरिक्षा परवाना देताना अर्जदाराकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाते.

मात्र, काही अर्जदारांकडून वरील अटींची पूर्तता होत नसतानाही खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून परवाना मिळविल्याच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर कार्यालयामार्फत ५० हून अधिक परवाना निलंबनाच्या अनुषंगाने नोटिसा बजावण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने दोषींवर कारवाई करण्यात येत आहे.

ऑटोरिक्षा परवान्यासाठी अर्ज करताना इच्छुकांनी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या शासन निर्णय क्रमांक एमव्हीआर ०८१५/प्र.क्र. ३८७ / परि-२, दिनांक १८ जुलै २०१७ मधील अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.

Releated Posts

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान

पोलादपूर | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात यंदा ‘दुबार मतदार’ हा…

ByByEditorial फरवरी 10, 2026

LIVE : महाराष्ट्रातील 29 महापालिकांचे निकाल आज; सकाळी 10 पासून मतमोजणी

10.10 Mumbai Municipal Corporation results : एकूण १४ टेबलावर मतमोजणी पार पडणार एकूण १४ टेबलावर मतमोजणी पार पडणार…

ByByEditorial जनवरी 16, 2026

महाड तालुक्यात हृदयद्रावक अपघात; आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

दिनेश चाफळकर, प्रतिनिधी महाड महाड | १० जानेवारी २०२६ :महाड तालुक्यातील सव परिसरात शिरगांव पोलीस चेक पोस्ट ते…

ByByEditorial जनवरी 11, 2026

महाड नगरपरिषद निवडणूक राडा: आणखी एक आरोपी अटकेत

दिनेश चाफळकर, प्रतिनिधी महाड महाड | ११ जानेवारी २०२६ :महाड नगरपरिषद निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना…

ByByEditorial जनवरी 11, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले