konkandhara.com

  • Home
  • बातम्या
  • अजित पवार – महिला IPS वाद प्रकरणात अमोल मिटकरींचा यूटर्न“माझी वैयक्तिक भूमिका होती, पक्षाची नव्हती; पोलिस दलाबद्दल सर्वोच्च आदर” – अमोल मिटकरी
Image

अजित पवार – महिला IPS वाद प्रकरणात अमोल मिटकरींचा यूटर्न“माझी वैयक्तिक भूमिका होती, पक्षाची नव्हती; पोलिस दलाबद्दल सर्वोच्च आदर” – अमोल मिटकरी

सोलापूर – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांच्या व्हिडीओ कॉलमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या वादावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आता माघार घेतली आहे. अंजना कृष्णा यांच्या नेमणुकीबाबत UPSC चौकशीची मागणी करणारे पत्र लिहिल्यानंतर मिटकरींनी सोशल मीडियावर दिलगिरी व्यक्त केली.

दिलगिरी व्यक्त करत घेतला यूटर्न

अमोल मिटकरींनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं –

“सोलापुर घटनेसंदर्भात केलेला ट्वीट मी बिनशर्थ मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती तर वैयक्तिक भूमिका होती. आपले पोलिस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्ण सहमत आहे.”

चौकशीची मागणी, नंतर माघार

शुक्रवारी मिटकरींनी UPSC ला पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

“पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणेच अंजना कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेत घोळ झाला असावा,” असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता.

मात्र राज्यभर निर्माण झालेल्या चर्चेनंतर मिटकरींनी आज आपली भूमिका मागे घेतली.

नेमकं प्रकरण काय?

माढा तालुक्यातील कुर्डू गावात मुरुम उत्खनन थांबवण्यासाठी अंजना कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यादरम्यान गावकऱ्यांशी वाद झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावला.
व्हिडीओत अजित पवार स्वतःचा परिचय देत “डीसीएम अजित पवार बोल रहा हूं… कार्यवाही बंद करो” असे सांगताना दिसतात. त्यावर कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही. पवार रागावत “इतनी डेरिंग है तुम्हारी… मेरा चेहरा तो पहचानोगा ना” असे म्हणत व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसले.

Releated Posts

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार…

ByByEditorial अप्रैल 3, 2026

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त,मनोजकुमार शिंदे यांची हकालपट्टी

प्रतिनिधी : कोकणधारा रोहा (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे.…

ByByEditorial अप्रैल 2, 2026

विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय;सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा: विकास लवांडे

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राज्यात सुरू असलेल्या चर्चांवर शरद पवार गटाने ठाम…

ByByEditorial अप्रैल 1, 2026

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचेच फोटो

प्रतिनिधी : कोकणधारा रोहे: रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवरून पक्षातील प्रमुख नेते अजित पवार आणि सुनेत्रा…

ByByEditorial मार्च 30, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले