konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • शिरोडा वेळागर येथे स्वच्छता अभियान उत्साहात; विविध मान्यवरांची उपस्थिती
शिरोडा वेळागर येथे भव्य स्वच्छता अभियान उत्साहात

शिरोडा वेळागर येथे स्वच्छता अभियान उत्साहात; विविध मान्यवरांची उपस्थिती

सिंधुदुर्ग | भूषण सावंत (प्रतिनिधी):


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने भव्य स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी ओरोस, पिंगुळी, माजगाव, सावंतवाडी, बांदा, तळवडे, शिरोडा आणि वेंगुर्ला येथील श्री समर्थ बैठकांमधील श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत स्वच्छतेचा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपली.

या स्वच्छता अभियानात सौ. लतिका लक्ष्मण रेडकर (सरपंच, शिरोडा), सौ. सुमती हरिश्चंद्र मसुरकर (माजी पंचायत समिती सदस्य), सिद्धेश विष्णू परब (माजी उपसरपंच), श्री. पांडुरंग बापू नाईक (ग्रामपंचायत सदस्य), श्री. निलेश मयेकर (मंडळ निरीक्षक), केशव कुडव (पोलीस पाटील, तळवडे) आदी मान्यवर उपस्थित होते.

उपक्रमादरम्यान परिसरातील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. “स्वच्छ गाव, सुंदर गाव” हा संदेश देत ग्रामस्थांनी स्वच्छतेची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला.

या अभियानामुळे परिसर स्वच्छतेकडे सकारात्मक वाटचाल करत असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

Releated Posts

मध्यपूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती; संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क जारी

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार अशा…

ByByEditorial मार्च 3, 2026

विकासाच्या राजकारणाला प्राधान्य; चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश

चिपळूण | योगेश बांडागळे (प्रतिनिधी): चिपळूणमध्ये माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. राधाताई लाड…

ByByEditorial मार्च 1, 2026

श्री सदस्यांचे कार्य म्हणजे समाजासाठी आदर्श – नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ

चिपळूण | कोंकणधारा प्रतिनिधी : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेच्या समारोप प्रसंगी बोलताना चिपळूणचे…

ByByEditorial मार्च 1, 2026

जिल्हा शासकीय रुग्णालयातील धार्मिक फलक हटवले

रत्नागिरी | कोंकणधारा प्रतिनिधी : रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी परिसरात अनधिकृतपणे लावण्यात आलेले धार्मिक आशयाचे फलक…

ByByEditorial मार्च 1, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

मध्यपूर्व तणाव : भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन व सूचना
चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश
श्री सदस्यांचे कार्य समाजासाठी आदर्श : उमेश सकपाळ
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील अनधिकृत धार्मिक फलक प्रशासनाने काढले; निवेदनानंतर तात्काळ कारवाई.
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जयंतीनिमित्त चिपळूणमध्ये स्वच्छता मोहीम
कोकणातील पहिल्या मानाया चिपळुणातील श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाला प्रारंभ
शिवराय फक्त योद्धा नव्हते! जाणून घ्या स्वराज्याचा खरा अर्थ
भगव्याची शपथ