konkandhara.com

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील अनधिकृत धार्मिक फलक प्रशासनाने काढले; निवेदनानंतर तात्काळ कारवाई.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील धार्मिक फलक हटवले

रत्नागिरी | कोंकणधारा प्रतिनिधी :


रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी परिसरात अनधिकृतपणे लावण्यात आलेले धार्मिक आशयाचे फलक प्रशासनाने काढून टाकले आहेत. संबंधित निवेदनाची दखल घेत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

काही दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या इमारतींच्या भिंतींवर ‘इफ्तारी का इंतिजाम’ आणि ‘सेहरी का इंतजाम किया जाएगा’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. हे फलक Young Memon Welfare Foundation आणि Armaan Group Ratnagiri या संस्थांच्या नावाने लावले असल्याचे समोर आले.

या संदर्भात हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे निवेदन सादर करून शासकीय ठिकाणी कोणत्याही धर्मविशिष्ट फलकांना परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच संबंधित फलक तात्काळ काढावेत आणि जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

निवेदनानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी फलक हटवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संबंधित फलक काढून टाकले.

या संदर्भात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या वतीनेही लेखी पत्र देण्यात आले असून, भविष्यात अशा प्रकारचे फलक लावले जाणार नाहीत याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या कारवाईनंतर शासकीय परिसरात नियमांचे पालन सुनिश्चित करण्यावर प्रशासनाने भर दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Releated Posts

मध्यपूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती; संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क जारी

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार अशा…

ByByEditorial मार्च 3, 2026

शिरोडा वेळागर येथे स्वच्छता अभियान उत्साहात; विविध मान्यवरांची उपस्थिती

सिंधुदुर्ग | भूषण सावंत (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने भव्य…

ByByEditorial मार्च 1, 2026

विकासाच्या राजकारणाला प्राधान्य; चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश

चिपळूण | योगेश बांडागळे (प्रतिनिधी): चिपळूणमध्ये माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. राधाताई लाड…

ByByEditorial मार्च 1, 2026

श्री सदस्यांचे कार्य म्हणजे समाजासाठी आदर्श – नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ

चिपळूण | कोंकणधारा प्रतिनिधी : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेच्या समारोप प्रसंगी बोलताना चिपळूणचे…

ByByEditorial मार्च 1, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

मध्यपूर्व तणाव : भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन व सूचना
शिरोडा वेळागर येथे भव्य स्वच्छता अभियान उत्साहात
चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश
श्री सदस्यांचे कार्य समाजासाठी आदर्श : उमेश सकपाळ
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जयंतीनिमित्त चिपळूणमध्ये स्वच्छता मोहीम
कोकणातील पहिल्या मानाया चिपळुणातील श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाला प्रारंभ
शिवराय फक्त योद्धा नव्हते! जाणून घ्या स्वराज्याचा खरा अर्थ
भगव्याची शपथ