रत्नागिरी – कोकणची संस्कृती, गणपती सण आणि कलात्मक परंपरेला उभारी देणाऱ्या “बाप्पा रील स्पर्धा २०२५” या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या निमित्तानं उदय सामंत यांनी सांगितलं की, महाराष्ट्र सरकारनं मराठी चित्रपटसृष्टीसाठी देशातील पहिलीच इन्सेंटिव्ह स्कीम आणली असून कोकण, विदर्भ, मराठवाडा येथील निर्माते, कलाकार आणि टेक्नीशियन यांना मोठं प्रोत्साहन मिळणार आहे.

वैभव मांगले यांच्या संकल्पना व संघर्षाच्या प्रवासाचा गौरव करण्यात आला. यावेळी वीणाताई जामकर, माजी आमदार राजन साळवी, बंड्याशेठ साळवी, राजेंद्र महाडिक, सुदेश मयेकर, परशुराम कदम, विजय खेडेकर, शिल्पाताई यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त सर्व कलाकार व सहभागींचं मनःपूर्वक अभिनंदन करून मराठी कला आणि संस्कृतीचा गौरव वाढविण्यात आला.