konkandhara.com

  • Home
  • Hindi
  • रत्नागिरीत बांबू परिषद आणि शेतकरी मेळावा; १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प
Image

रत्नागिरीत बांबू परिषद आणि शेतकरी मेळावा; १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प

रत्नागिरी | आज रत्नागिरीतील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात बांबू परिषद व शेतकरी मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

या वेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, “बांबू ही फक्त एक पिकाची संकल्पना नसून, उत्पन्न वाढवण्याचा आणि नवे उद्योग निर्माण करण्याचा क्रांतिकारी मार्ग आहे.”

👉 येत्या १७ सप्टेंबरला राज्य सरकार महाराष्ट्राची पहिली बांबू पॉलिसी जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
👉 योग्य नियोजन व शेतकऱ्यांच्या सहभागाने बांबू लागवडीतून प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा ₹३०,००० ते ₹४०,००० अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.
👉 रत्नागिरी जिल्ह्यात किमान १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.
👉 बांबूपासून फर्निचर, ज्वेलरी, कापड, शूज, मेथेनॉल अशा विविध उद्योगांना चालना मिळू शकते.
👉 विमानतळ टर्मिनल बिल्डिंगमधील ५०% फर्निचर बांबूपासून तयार करण्यात येणार आहे, हे कोकणासाठी अभिमानाचे पाऊल असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

“ही परिषद फक्त चर्चा नसून, शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवा आर्थिक आधार देणारी चळवळ आहे. रत्नागिरी महाराष्ट्रातील सर्वात मोठा बांबू लागवड करणारा जिल्हा बनणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वेळी मंडळाध्यक्ष पाशाभाई पटेल, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Releated Posts

कोकणात नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम : रोहा तालुक्यात महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम

कोकणात सध्या नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम पाहायला मिळत आहे. रोहा तालुक्यातील वर्से गावात काळभैरव ग्रामस्थ मंडळाने नव्याने बांधलेल्या जरीमरी…

ByByEditorialसितम्बर 28, 2025

आमदार बाई, पण फोटोबाजीवर स्टॉप! पती अधिकाऱ्याचं धडक पत्र व्हायरल

संभाजीनगर : भाजप आमदार पत्नीला पती अधिकाऱ्याचं थेट पत्र – “माझे फोटो वापरु नका!” संभाजीनगर : ग्रामीण भागात…

ByByEditorialसितम्बर 28, 2025

कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय कायम

कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय कायम; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली मुंबई/कर्जत — कर्जत विधानसभा मतदारसंघातील आमदार…

ByByEditorialसितम्बर 28, 2025

लडाख : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक अटकेत, लेहमध्ये कर्फ्यू कायम

लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा…

ByBycare.eviano@gmail.comसितम्बर 26, 2025
Image Not Found
Image Not Found

Gallery

I Am on the Hit List: Gauri Lankesh — एका हत्येच्या पार्श्वभूमीवर वाढती तानाशाहीची सावली
फिडेल कॅस्ट्रो — क्रांती, सत्ता आणि व्यक्तिमत्वाची गुंफण
The Many Lives of Syeda Xलेखक: Neha Dixit
कोकणात नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम : रोहा तालुक्यात महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम
“दुष्काळानं होरपळलेला मराठवाडा आता पूरानं डुबला! हजारो कुटुंबं बेघर
आमदार बाई, पण फोटोबाजीवर स्टॉप! पती अधिकाऱ्याचं धडक पत्र व्हायरल
कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय कायम
माणगाव तालुक्यात बनावट चलनी नोटांचे रॅकेट उध्वस्त
ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप घोटाळ्यात १९ कोटींचा भांडाफोड