konkandhara.com

  • Home
  • बातम्या
  • Pune Crime: आंदेकर–कोमकर टोळी संघर्षात आयुष कोमकरची हत्या; “सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई” – पोलीस आयुक्त
Image

Pune Crime: आंदेकर–कोमकर टोळी संघर्षात आयुष कोमकरची हत्या; “सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई” – पोलीस आयुक्त

वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून कोमकर गँगवर हल्ला; मकोका लावण्याचा इशारा

पुणे | शहरात पुन्हा एकदा टोळी संघर्ष पेटला आहे. आंदेकर आणि कोमकर या दोन टोळ्यांमधील वैर चिघळत जाऊन 20 वर्षीय आयुष गणेश कोमकरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या गणपती विसर्जनाच्या आदल्या रात्री पुण्यातील नाना चौकात झाली. आयुष कोमकर हा वनराज आंदेकरचा भाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काय घडलं?

आयुष कोमकर क्लासवरून घरी परत आला होता. बिल्डिंगच्या खाली थांबलेल्या आयुषवर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला. या हत्येमागे वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला असल्याचे पोलिस तपासात समोर आले.

“सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई” – पोलीस आयुक्त

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हत्येनंतर पत्रकार परिषदेत सांगितले,
“वादातून स्वतःच्या नातवाची किंवा बहिणीच्या मुलाची हत्या केली जाईल असा अंदाज पोलिसांना नव्हता. मात्र, आता गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई होईल. कोणत्याच गँगच्या चुकीला माफी नाही.”

त्यांनी या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याचा इशाराही दिला आहे.

बंडू आंदेकरवर गुन्हा दाखल

या हत्येनंतर समर्थ पोलीस ठाण्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पार्श्वभूमी: वनराज आंदेकरची हत्या

1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली होती.

या प्रकरणात संजीवनी कोमकर, तिचा पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर सध्या तुरुंगात आहेत.

आंदेकर गँगने त्याचाच बदला घेण्यासाठी आयुष कोमकरवर हल्ला केल्याची शक्यता तपासात आहे.

याआधीच फसला होता हत्येचा प्लॅन

तपासात समोर आलं आहे की आंदेकर टोळीने काही दिवसांपूर्वीच कोमकर गँगवर हल्ल्याचा प्लॅन आखला होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आंदेकर टोळीतील काही गुंडांना अटक करून तो प्रयत्न फसवला होता. परंतु, त्याच्या अवघ्या चार दिवसांतच आयुष कोमकरची हत्या करण्यात आली.

Releated Posts

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून,…

ByByEditorial मार्च 23, 2026

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात ११ ग्रामपंचायतींचे ठराव; आंदोलनाला अधिक धार

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली…

ByByEditorial मार्च 20, 2026

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये २७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली…

ByByEditorial मार्च 13, 2026

व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : बाजारात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉस्टेल्स, पेइंग गेस्ट (PG) व्यवस्था आणि हॉटेल…

ByByEditorial मार्च 11, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख