नंदुरबार | शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक संदेश देणारा आणि पालकांना प्रेरणा देणारा आदर्श निर्णय जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी घेतला आहे. त्यांनी स्वतःच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या (ZP) शाळेत दाखल करून ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता आणि विश्वासार्हतेबाबतचा ठाम संदेश दिला आहे.
सामान्यतः अधिकारी वर्ग व नागरी समाजातील अनेक पालक आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यास प्राधान्य देतात. मात्र, जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी स्वतःच्या वर्तनातून ‘ZP शाळा केवळ गरजूंसाठी नाहीत, तर सक्षम व दर्जेदार शिक्षण देऊ शकतात’ हे दाखवून दिले आहे.
त्यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून, सरकारी शाळांकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा मिळत आहे.