konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ बुकिंगसह आजपासून प्रवास सुरू

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ!

सिंधुदुर्ग –महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद ‘एम-टू-एम’ रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता मुंबईतील भाऊचा धक्का येथे या सेवेचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यानंतर ही बोट विजयदुर्गकडे प्रस्थान करणार असून, या प्रवासासाठी प्रवाशांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. पहिल्याच दिवशी विविध श्रेणींमधून जवळपास सर्वच तिकीट बुकिंग होत आली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे की, सुमारे ६२६ प्रवासी आणि मोठ्या संख्येने वाहने वाहून नेण्याची क्षमता असलेले हे अत्याधुनिक रो-रो जहाज मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर अवघ्या ६ ते ७ तासांत पूर्ण करणार आहे. सुरक्षित आणि आरामदायी समुद्रप्रवासासोबतच पर्यटकांना कोकणचा विस्तीर्ण निसर्गरम्य समुद्रकिनारा अनुभवण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. ही सेवा महाराष्ट्राच्या सागरी वाहतुकीच्या इतिहासातील एक नवीन आणि वैभवशाली अध्याय ठरणार असून, भविष्यात या सेवेमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. कोकणाला वेगवान कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आणि राज्याच्या सागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर प्रत्यक्षात साकार झाला आहे. या प्रतिसादाबद्दल बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, कोकणवासीयांनी या सेवेचे केलेले स्वागत हे या प्रकल्पाच्या यशाची पावती आहे. या सेवेमुळे केवळ वेळेची बचत होणार नाही, तर कोकणातील पर्यटन, स्थानिक व्यापार आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळेल. उद्याच्या पहिल्या फेरीसाठी झालेल्या बुकिंगच्या तपशिलानुसार, सर्वाधिक पसंती इकोनॉमी श्रेणीला मिळाली असून प्रीमियम श्रेणी, बिझनेस श्रेणी आणि प्रथम दर्जा (फर्स्ट क्लास) श्रेणीत देखील प्रवाशांनी आपले स्थान आरक्षित केले आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी ₹३,००० पासून ₹९,००० पर्यंतचे विविध तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. केवळ प्रवासीच नव्हे तर वाहनांच्या वाहतुकीसाठीही या सेवेला उत्तम प्रतिसाद लाभला असून, पहिल्याच दिवशी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. या प्रतिसादावरून मुंबई-कोकण प्रवासासाठी ही सेवा किती आवश्यक आहे हे स्पष्ट होते.

Releated Posts

मध्यपूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती; संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क जारी

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार अशा…

ByByEditorial मार्च 3, 2026

शिरोडा वेळागर येथे स्वच्छता अभियान उत्साहात; विविध मान्यवरांची उपस्थिती

सिंधुदुर्ग | भूषण सावंत (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने भव्य…

ByByEditorial मार्च 1, 2026

विकासाच्या राजकारणाला प्राधान्य; चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश

चिपळूण | योगेश बांडागळे (प्रतिनिधी): चिपळूणमध्ये माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. राधाताई लाड…

ByByEditorial मार्च 1, 2026

श्री सदस्यांचे कार्य म्हणजे समाजासाठी आदर्श – नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ

चिपळूण | कोंकणधारा प्रतिनिधी : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेच्या समारोप प्रसंगी बोलताना चिपळूणचे…

ByByEditorial मार्च 1, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

मध्यपूर्व तणाव : भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन व सूचना
शिरोडा वेळागर येथे भव्य स्वच्छता अभियान उत्साहात
चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश
श्री सदस्यांचे कार्य समाजासाठी आदर्श : उमेश सकपाळ
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील अनधिकृत धार्मिक फलक प्रशासनाने काढले; निवेदनानंतर तात्काळ कारवाई.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जयंतीनिमित्त चिपळूणमध्ये स्वच्छता मोहीम
कोकणातील पहिल्या मानाया चिपळुणातील श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाला प्रारंभ
शिवराय फक्त योद्धा नव्हते! जाणून घ्या स्वराज्याचा खरा अर्थ
भगव्याची शपथ