ठाणे – ठाणे आणि मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित मेट्रो मार्ग 4 व 4अचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएकडून गायमुख ते विजय गार्डन स्टेशनदरम्यान मेट्रोची तांत्रिक तपासणी व चाचणी यशस्वीरीत्या पार पडली.
👉 प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
- मेट्रो मार्ग 4 (32.32 किमी) व 4अ (2.88 किमी), एकूण लांबी 35.20 किमी
- 8 डब्यांची मेट्रो, एकूण 32 स्थानके
- अंदाजे ₹16,000 कोटी खर्च
- दररोज सुमारे 13.43 लाख प्रवासी प्रवास करतील
- मोगरपाडा येथे 45 हेक्टर जागेवर डेपो, ज्यातून मेट्रो 4, 4अ, 10 व 11 चे व्यवस्थापन
- पूर्व व पश्चिम उपनगरांना ठाणे आणि मुंबईशी जोडणारा प्रकल्प
- वडाळा ते सीएसएमटी जोडणाऱ्या मेट्रो 11 शी मिळालेली जोडणी झाल्यावर देशातील सर्वात लांब 58 किमी कॉरिडॉर
- प्रवासाचा वेळ 50–75% कमी, रस्त्यांवरील ताण घटणार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या प्रयत्नांचे कौतुक करत काम अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ठाणेकर व मुंबईकरांना या सोयीचा लवकरात लवकर लाभ मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तसेच त्यांनी सांगितले की, ठाणे रिंग मेट्रोला केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून हा प्रकल्प देखील भविष्यातील वाहतूक सोयीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.