छत्रपती संभाजीनगर | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, मराठा समाज आरक्षणात जाणारच आणि यावर आता कुठलाही संभ्रम नाही. “कुणाच्या खोडीला काही होणार नाही. सरकारने काढलेला जीआर योग्य असून, त्यात जर त्रुटी असतील तर दुरुस्त केल्या जातील,” असं ठाम विधान त्यांनी केलं.
सध्या उपचार घेत असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला.
🔹 “मुलं मुंबईतून जिवंत करून आली”
जरांगे म्हणाले –
“जर आमचा सरकारवर, फडणवीसांवर राग असता, तर आमची मुलं निब्बर बनियानवर असती. पण त्यांनी मुंबईत जिवंत परत येऊन दाखवलं.”
🔹 जीआर मान्य, पण त्रुटी दुरुस्त
“जीआरमध्ये काही त्रुटी आहेत, पण त्या दुरुस्त करू. सुधारित जीआर लवकरच निघेल.”
“प्रक्रिया, टाइम बॉंड आणि सुरुवातीची तारीख याबाबत मुख्यमंत्री व विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे.”
“आम्ही सरसकट आरक्षण नको म्हणत नाही, पण गरीब मराठे थेट आरक्षणात जातील.”
🔹 संजय राऊत व इतरांना प्रत्युत्तर
“हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हाताळलं, दुसऱ्या कुणी नाही.”
“उपोषण आम्ही करायचं आणि श्रेय दुसऱ्यांनी घ्यायचं? हे आम्ही मान्य करणार नाही.”
“संजय राऊत फार बोलत आहेत, एवढं बार जाऊ द्या.”
🔹 भुजबळांवर खोचक टोला
“आम्ही ओबीसींमध्ये गेलो नाही, तर ते आमच्यात आले आहेत. भुजबळांना माहिती होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. त्यांनी अनेक पक्ष हाताळलेत, त्यामुळे जीआर त्यांना नीट कळतो. पण मराठा समाजाला ‘घुसखोर’ म्हणणं योग्य नाही. हे अधिकृत आहे,” असा टोला जरांगेंनी लगावला.
🔹 “मंडल आयोगावर चॅलेंज करू”
“भुजबळ कोर्टात गेले तरी काही होणार नाही. हैद्राबाद गॅझेट हा सरकारी दस्तऐवज आहे.”
“जर कोर्टात प्रश्न निर्माण झाले तर मी मंडल आयोगालाच चॅलेंज करेन.”
👉 एकंदर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाच्या ठाम भूमिकेची पुनरावृत्ती केली आणि विरोधकांना थेट इशारा दिला –
“गरीब मराठ्यांची लढाई आम्हीच लढतोय. यात कुणाच्याही खोडीला काही होणार नाही.