konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • विकासाच्या राजकारणाला प्राधान्य; चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश
चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश

विकासाच्या राजकारणाला प्राधान्य; चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश

चिपळूण | योगेश बांडागळे (प्रतिनिधी):


चिपळूणमध्ये माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. राधाताई लाड सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार निलेश राणे यांनी विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.

“लोकांना राजकारणाशी काही देणंघेणं नाही, त्यांना विकास हवा आहे. कुडाळ मतदारसंघासोबतच चिपळूणमधील विकासकामांचाही नियमित फॉलोअप घेणार,” अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसाचे १६ तास काम करतात तसेच पालकमंत्री उदय सामंत यांचे सातत्याने सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना महिला आघाडी प्रमुख रश्मी गोखले, जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, तालुकाप्रमुख बापू आयरे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, गटनेते अंकुश आवले, पाणी समिती सभापती निहार कोवळे, माजी नगरसेवक करामत मिठागरी, शिक्षण व क्रीडा समिती सभापती हर्षाली पवार, नीलम जाधव, राणी महाडिक, रुपेश घाग, दिलीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरटकर यांनी केले.

परिमल भोसले हे धडाडीचे कार्यकर्ते असून त्यांना पक्षात सन्मानाने स्थान द्यावे, असे आवाहन आमदार राणे यांनी केले. तसेच पाग पॉवर हाऊस परिसरात उड्डाणपुलासाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

या पक्षप्रवेशामुळे चिपळूणमधील स्थानिक राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Releated Posts

शिरोडा वेळागर येथे स्वच्छता अभियान उत्साहात; विविध मान्यवरांची उपस्थिती

सिंधुदुर्ग | भूषण सावंत (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने भव्य…

ByByEditorial मार्च 1, 2026

श्री सदस्यांचे कार्य म्हणजे समाजासाठी आदर्श – नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ

चिपळूण | कोंकणधारा प्रतिनिधी : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेच्या समारोप प्रसंगी बोलताना चिपळूणचे…

ByByEditorial मार्च 1, 2026

जिल्हा शासकीय रुग्णालयातील धार्मिक फलक हटवले

रत्नागिरी | कोंकणधारा प्रतिनिधी : रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी परिसरात अनधिकृतपणे लावण्यात आलेले धार्मिक आशयाचे फलक…

ByByEditorial मार्च 1, 2026

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ बुकिंगसह आजपासून प्रवास सुरू मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ! सिंधुदुर्ग –महाराष्ट्र सागरी…

ByByEditorial मार्च 1, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

मध्यपूर्व तणाव : भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन व सूचना
शिरोडा वेळागर येथे भव्य स्वच्छता अभियान उत्साहात
श्री सदस्यांचे कार्य समाजासाठी आदर्श : उमेश सकपाळ
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील अनधिकृत धार्मिक फलक प्रशासनाने काढले; निवेदनानंतर तात्काळ कारवाई.
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जयंतीनिमित्त चिपळूणमध्ये स्वच्छता मोहीम
कोकणातील पहिल्या मानाया चिपळुणातील श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाला प्रारंभ
शिवराय फक्त योद्धा नव्हते! जाणून घ्या स्वराज्याचा खरा अर्थ
भगव्याची शपथ