सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी आज थेट मटका बुकीवर छापा टाकत मोठी कारवाई केली. कणकवली शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या महादेव रमाकांत घेवारी यांच्या मटका अड्ड्यावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी ही धाड घातली.
🟠 घटनास्थळीच थेट धाड
या अड्ड्यावर अचानक पोहोचल्यावर काही जण पैसे आणि चिठ्ठ्यांसह आढळले. मंत्री राणे यांनी स्वतः चौकशी केली आणि तत्काळ कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना फोन करून कारवाईसाठी घटनास्थळी बोलावले.
🟠 पोलिसांचा तातडीचा सपाटा
यानंतर पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाली व ११ संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या छाप्यातून रोख रक्कम, लॅपटॉप, मटका पावत्या जप्त केल्या आहेत. या कारवाईनंतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये चांगलीच धांदड उडाल्याचे चित्र दिसत आहे.
🟠 चर्चेत नितेश राणे
गेल्या काही दिवसांत नितेश राणे यांनी राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्यातच आज स्वतः मटका अड्ड्यावर धाड घालून त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात आणि राजकीय वर्तुळात या घटनेची मोठी चर्चा सुरु आहे.