मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्रातून मोठी पुढाकार घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून भाजपा महाराष्ट्र प्रदेशतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला झेंडा दाखवून रवाना केले.
पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडे आणि आवश्यक सामग्री असलेला हा मदत ट्रक जम्मू-काश्मीरकडे रवाना झाला असून, यामुळे तेथील पुनर्वसन प्रक्रियेला मोठा हातभार लागणार आहे.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.