नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत २५ वर्षांच्या प्रवासाचा शेवट करत असल्याचं त्याने म्हटलं. मिश्रा भारतासाठी 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळला. कसोटीत 76, वनडेत 64 आणि टी-20 मध्ये 16 बळी घेतले.
निवृत्तीची घोषणा करताना मिश्रा काय म्हणाला?
“आज, 25 वर्षांनंतर, मी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. हा खेळ माझे पहिले प्रेम, माझा शिक्षक आणि आनंदाचा सर्वात मोठा स्रोत आहे. बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, प्रशिक्षक, सहकारी आणि चाहत्यांचे आभार. क्रिकेटने मला सर्व काही दिलं आणि आता या खेळाला काहीतरी परत देण्यास उत्सुक आहे.” — अमित मिश्रा
अमित मिश्राची कारकीर्द
पदार्पण: 2003 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत.
कसोटी पदार्पण: 2008, मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध; पहिल्याच सामन्यात 5 बळी.
विशेष कामगिरी: 2013 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेत 18 बळी, जवागल श्रीनाथच्या विक्रमाशी बरोबरी.
टी-20 विश्वचषक 2014: 10 बळी घेत भारताला मदत.
आयपीएल: अनेक संघांसाठी खेळला. शेवटचा सामना IPL 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध.
मागील आठवड्यात तिनंनी निवृत्ती जाहीर केली
27 ऑगस्ट 2025 – रवीचंद्रन अश्विन, आयपीएलमधून निवृत्ती
2 सप्टेंबर 2025 – आसिफ अली, पाकिस्तानकडून सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
4 सप्टेंबर 2025 – अमित मिश्रा, भारतीय क्रिकेटपटू (सर्व फॉरमॅट)