konkandhara.com

  • Home
  • बातम्या
  • पुण्यात नाना पेठेत रक्तरंजित टोळीयुद्ध; आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्यागणेशोत्सवाच्या सुरक्षेनंतर अवघ्या दोन तासांत गडबड; रोहित पवारांचा सरकारवर संताप
Image

पुण्यात नाना पेठेत रक्तरंजित टोळीयुद्ध; आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्यागणेशोत्सवाच्या सुरक्षेनंतर अवघ्या दोन तासांत गडबड; रोहित पवारांचा सरकारवर संताप

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ५) शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून रूट मार्च काढला होता. मात्र, या बंदोबस्तानंतर अवघ्या दोन तासांतच पुण्याच्या नाना पेठ परिसरात टोळीयुद्ध उफाळले आणि रक्तरंजित थरार घडला. आंदेकर टोळी व कोमकर गटातील वर्चस्वाच्या संघर्षातून आयुष कोमकर (Ayush Komkar) याची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची हत्या झाली होती. या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या गणेश कोमकर (Ganesh Komkar) याचा मुलगा आयुष याच्यावर शुक्रवारी संध्याकाळी पार्किंगमध्ये घात झाला.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी एक्सवर लिहिलं –

“लाखो भक्तांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठा गणेशोत्सव पुण्यात साजरा होत असताना टोळीयुद्धाचा भडका उडतो. एक टोळी दुसऱ्यावर धडधडीतपणे गोळ्या चालवते आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून रक्तरंजित होळी खेळली जाते. प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसलाय. अशा परिस्थितीत लोक विचारत आहेत — कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’?”

नेमकं काय आहे प्रकरण?

१ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा वर्चस्वाच्या वादातून खून झाला.

आंदेकर टोळी बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती.

आंबेगाव पठार भागात टोळी रेकी करत असल्याचं समोर आलं होतं, मात्र कारवाई असूनही हल्ला शहराच्या मध्यवर्ती भागातच घडला.

Releated Posts

कोकणात नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम : रोहा तालुक्यात महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम

कोकणात सध्या नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम पाहायला मिळत आहे. रोहा तालुक्यातील वर्से गावात काळभैरव ग्रामस्थ मंडळाने नव्याने बांधलेल्या जरीमरी…

ByByEditorialसितम्बर 28, 2025

आमदार बाई, पण फोटोबाजीवर स्टॉप! पती अधिकाऱ्याचं धडक पत्र व्हायरल

संभाजीनगर : भाजप आमदार पत्नीला पती अधिकाऱ्याचं थेट पत्र – “माझे फोटो वापरु नका!” संभाजीनगर : ग्रामीण भागात…

ByByEditorialसितम्बर 28, 2025

लडाख : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक अटकेत, लेहमध्ये कर्फ्यू कायम

लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा…

ByBycare.eviano@gmail.comसितम्बर 26, 2025

रत्नागिरीत आईनेच आठ महिन्यांच्या मुलीची हत्या; पोलिस तपास सुरू

रत्नागिरी, कारवांचीवाडी पारसनगर येथे एका आईने आपल्या आठ महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतक बालिकेचे…

ByByEditorialसितम्बर 26, 2025
Image Not Found
Image Not Found

Gallery

I Am on the Hit List: Gauri Lankesh — एका हत्येच्या पार्श्वभूमीवर वाढती तानाशाहीची सावली
फिडेल कॅस्ट्रो — क्रांती, सत्ता आणि व्यक्तिमत्वाची गुंफण
The Many Lives of Syeda Xलेखक: Neha Dixit
कोकणात नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम : रोहा तालुक्यात महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम
“दुष्काळानं होरपळलेला मराठवाडा आता पूरानं डुबला! हजारो कुटुंबं बेघर
आमदार बाई, पण फोटोबाजीवर स्टॉप! पती अधिकाऱ्याचं धडक पत्र व्हायरल
कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय कायम
माणगाव तालुक्यात बनावट चलनी नोटांचे रॅकेट उध्वस्त
ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप घोटाळ्यात १९ कोटींचा भांडाफोड