konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • व्हॉइस ऑफ मीडिया सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची निवड
Image

व्हॉइस ऑफ मीडिया सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची निवड

​दोडामार्ग : भूषण सावंत : ९८ देशांत कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या जागतिक पत्रकार संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर, संघटनेच्या कार्याला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तालुकास्तरावर कार्यकारिणी विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


​या सभेचा मुख्य उद्देश गावपातळीवरील पत्रकारांना संघटनेच्या व्यासपीठावर एकत्र आणणे हा होता. पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्या कामातील अडचणी समजून घेऊन त्या प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी तालुकास्तरावर सक्रिय टीम असणे आवश्यक आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यश माधव यांची तरुण, तडफदार आणि धडाकेबाज पत्रकार म्हणून असलेली ओळख संघटनेसाठी मोलाची ठरेल, या उद्देशाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माधव यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव संघटित होतील आणि संघटना अधिक बलशाली होईल, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


​या निवडीप्रसंगी जिल्हाध्यक्ष भूषण सावंत, शैलेश मयेकर, विष्णू धावडे, कार्याध्यक्ष संजय पिळणकर, मिलिंद धुरी व भूषण देसाई, सरचिटणीस अमित पालव, खजिनदार आनंद कांडरकर, उपाध्यक्ष जय भोसले, सुयोग पंडित व राजा दळवी, जनसंपर्क आणि प्रसिद्धीप्रमुख दीपक पटेकर, संघटक नयनेश गावडे, कार्यवाहक विजय सावंत आणि सदस्य रणजीत जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर यश माधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे