konkandhara.com

EditorialWebdesk

निकृष्ट रस्ता कामाविरोधात उसप येथे ग्रामस्थांचे उपोषण

दोडामार्ग : भूषण सावंत:

पिकुळे तिठा ते उसप या मुख्य रस्त्याच्या कामात झालेल्या दिरंगाईसोबतच अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात उसप येथील ग्रामस्थांनी आज, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी तीव्र आंदोलन छेडत उपोषण सुरू केले आहे.


प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. सदर रस्ता हा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, कामाचा दर्जा खालावलेला असल्याने तसेच काम वेळेत पूर्ण होत नसल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


या उपोषणात खालील ग्रामस्थ सहभागी झाले आहेत श्री. देवू बाळू गवस, सुरेश विष्णू गवस, शंकर बाळाराम नाईक, रामा गोविंद धुरी, विठोबा नारायण नाईक, सखाराम नाईक, महादेव सुतार, विजय गवस, प्रकाश मोरजकर, वैभव विष्णू गवस, सुनील गवस, मनीष गवस, शैलेश गवस, अमोल मोरजकर, दिनेश नाईक, सुनील गवस सहभागी झाले आहेत.
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, रस्ता कामाची तात्काळ चौकशी करून दर्जेदार काम पूर्ण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. या उपोषणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान