konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • वादळी पावसामुळे लांजा-राजापूरमध्ये मोठे नुकसान; आमदार किरण सामंतांची घटनास्थळी पाहणी
Image

वादळी पावसामुळे लांजा-राजापूरमध्ये मोठे नुकसान; आमदार किरण सामंतांची घटनास्थळी पाहणी

लांजा: रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाने धुमाकूळ घालत लांजा आणि राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली, झाडे कोसळली, वीजवाहिन्या तुटल्या तर शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत विविध भागांची पाहणी केली.

वादळी पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून थेट फिल्डवर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. गावोगावी भेट देत त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला तसेच त्यांना धीर दिला. अनेक ठिकाणी कोसळलेली झाडे, उडालेली घरांची छपरे आणि बाधित वीजपुरवठ्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी आमदार किरण सामंत यांनी लांजा आणि राजापूर तहसीलदारांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्तांना शासनाची मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी महसूल विभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

वादळी पावसामुळे शेती, घरांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान शासन दरबारी प्रभावीपणे मांडून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार किरण सामंत यांनी सांगितले. तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या.

दरम्यान, आमदार किरण सामंत स्वतः फिल्डवर उतरून परिस्थितीचा आढावा घेत असल्याने नुकसानग्रस्त नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनही तातडीने कामाला लागल्याने पंचनामे आणि मदत प्रक्रिया जलद गतीने सुरू झाली आहे.

यावेळी लांजा नगराध्यक्ष सावली कुरूप, तहसीलदार प्रियंका ढोले, नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी, राजू कुरूप, मुन्ना खामकर, बाबाशेठ भिंगार्डे, नगरसेवक वैभव जोईल, सचिन डोंगरकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे