konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांसह हातभट्टीवर पोलिसांची कारवाई
संगमेश्वरमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कारवाई | हातभट्टीवर पोलिसांचा छापा

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांसह हातभट्टीवर पोलिसांची कारवाई

संगमेश्वर (प्रतिनिधी) : देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी अवैध दारू विक्री व सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया केल्या.

पहाटे सुमारे १:३० वाजता कांजिवरा ते रत्नागिरी रोडवरील ओजी बिअरशॉपीसमोर सिमेंटच्या बाकावर बसून विनापरवाना बिअर पिणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अभिजीत अनंत जाधव (वय ३०) व नईम मुनवर पटेल (वय २४) अशी त्यांची नावे असून, त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०५ वाजता देवरुख खालची आळी येथील मच्छीमार्केटच्या पाठीमागे, गणेश घाटाजवळील नदीकिनारी पोलिसांनी हातभट्टीवर कारवाई केली. यावेळी निलेश बाळकृष्ण निवळकर (वय ३९) हा गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याच्याकडून ८ लिटर गावठी दारू व अन्य साहित्य असा एकूण ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४९/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

या कारवायांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Releated Posts

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची…

ByByEditorial मई 13, 2026

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे