konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • साखरपा-देवरुख मार्गावर भीषण अपघात;चौदा चाकी ट्रक डोंगराला धडकला, चालक जखमी
Image

साखरपा-देवरुख मार्गावर भीषण अपघात;चौदा चाकी ट्रक डोंगराला धडकला, चालक जखमी

संगमेश्वर : तालुक्यातील साखरपा-देवरुख मार्गावर आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. चालकाचा ताबा सुटल्याने चौदा चाकी ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराच्या कपारीत जाऊन जोरात धडकला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून ग्रामस्थ व पोलिसांच्या तत्पर मदतीमुळे त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत विठ्ठल शिंगटे (वय ४६) हे रिकाम्या ट्रकने (क्र. यूपी ३५ एटी १२९२) देवरुखकडून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. साखरपा-देवरुख रस्त्यावर कोंडगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आले असता अचानक ट्रकवरील त्यांचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर आदळला.

धडक इतकी जोरदार होती की, ट्रक चालक केबिनमध्येच अडकून पडला. अपघाताची माहिती मिळताच देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहायक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, स्थानिक पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे तसेच पारस साखरे, अंकुश सुर्वे, साहिल चव्हाण व मुरलीधर पांचाळ या ग्रामस्थांनी बचाव कार्यात मोलाची मदत केली. रवी इन्फ्रा कंपनीच्या हायड्रा मशीनच्या साहाय्याने ट्रकचे पत्रे बाजूला करून चालकाला बाहेर काढण्यात आले.

जखमी चालक हनुमंत शिंगटे यांना तातडीने साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे