konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • रोहा तालुक्यात करोडोच्या पाणी योजनांच्या कामांच्या दर्जाबाबत शंका.
Image

रोहा तालुक्यात करोडोच्या पाणी योजनांच्या कामांच्या दर्जाबाबत शंका.

इथल्या नेत्यांचेच तालुक्याच्या बाबतीत नियोजन नसल्याने आजही रोहा तहानलेला.

कोलाड ४ एप्रिल (शरद जाधव)

नागरिकांच्या मूलभूत सोयी मध्ये पाणी हे महत्त्वाचे आहे. भविष्याचा काळात पाणीटंचाई होऊ नये म्हणून अनेक पाणी योजना शासन राबवत असतात. रोहा तालुक्यात अनेक गावागावात करोडच्या पाणी योजना राबविल्या जात आहेत. मात्र योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत असून सत्ताधारी नेत्यांचे आपल्या तालुक्यातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे नियोजन नसल्याने आजही रोहा तहानलेलाच अशी खंत व्यक्त होताना दिसत आहे.

रोहा तालुक्याला कुंडलिका नदीचे वरदान मिळाले आहे. त्यामुळे नदीतून असंख्य गावांच्या पाणी योजना चालू आहेत. शासनाने प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर पाणी गेले पाहिजे. हे उद्दिष्ट ठेवूनच अनेक पाणी योजना अमलात आणल्या. यामध्ये भारत निर्माण, पायलट योजना ,व सध्या मोदी सरकारच्या काळात सुरू असलेली जल जीवन मिशन योजना . रोहा तालुक्यात प्रत्येक गावात या योजना राबविल्या गेल्या आहेत. परंतु नियोजन नसल्याने आजही रोहा तालुक्यात अनेक गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे.

गेली अनेक वर्षे इथले नेते सत्ताधारी आहेत. परंतु रोहा तालुक्यात कुठला गाव दाखवा की त्या ठिकाणी खराखुरा शाश्वत विकास पोहोचला आहे .कार्यकर्त्यांना ठेकेदारी चा तुकडा त्यातूनच मतांचे राजकारण आणि सत्ता हेच गणित त्यामुळे गावे सुधारली नाही मात्र साहेबांची परिस्थिती चांगलीच सुधारली.

गावात कुठलाही विकास काम असेल बाहेरील ठेकेदार, कोनी कामा बाबतीत बोलायचं नाही. हेच धोरण त्यामुळे निधी आला पण तो वाया गेला. नेत्यांनी फक्त खुर्ची टिकवली परंतु गावागावात बारामती पॅटर्न राबवता आला नाही.
आज रोहा तालुक्यातील पाणी योजनेत प्रचंड गोंधळ सुरू आहे. बीड नाशिकचे ठेकेदार चुना लावून गेलेत. अधिकाऱ्यांची फक्त पोपटपंची. कामावर लक्ष नाही. शासनाचा निधी आहे. योजना काही सारख्या सारख्या होत नाहीत .भविष्यात गावाला पाणी मिळणार आहे .याच त्यांना काही नाही. अभियंता गांगुर्डे तर पाणी योजनात गांगारलेलेत वाटते .व्यवस्थित बोलतच नाहीत. तर कुलम अधिकारी हे कुलभूमिकेत. अशा वेळेस स्थानिक आमदार खासदार यांनी लक्ष घालणं गरजेचे आहे. मात्र गावागावात वर्षानुवर्ष मतांची परफेक्ट बांधणी त्यामुळे सत्ता कायम. त्यांना काही फरक पडत नाही त्यामुळे सामान्य नागरिकांचे मात्र भविष्याच्या काळात खूप नुकसान होणार आहे

रोहा तालुक्यात कालव्याला पाणी मिळावे. शेती वाचावी याकरता शेतकरी जागृत झाले आहेत. अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश येऊन कालव्याला पाणी सुटले. त्यामुळे आपला विकास आता आपणच करायला पाहिजे. याकरता गावातील तरुणांनी, जागरूक नागरिकांनी, गावच्या विकासाकरता पुढे आले पाहिजे. तरच गावचा शाश्वत विकास होईल. अन्यथा येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती राहील.

पूगाव ग्रामपंचायत मध्ये नवीन योजना कार्यन्वित झाली. तेव्हापासून दुरुस्तीची कामे. मग योजनेची गुणवत्ता काय. कोलाड सारखे ग्रामपंचायत मध्ये करोडची पाणी योजना सर्वच बट्ट्या बोल , नवीन विहीर कलंडली. मातीचा आधार देऊन उभी. अधिकाऱ्यांकडे चौकशी केली तर काही नाही झाले. खोटे उत्तर. मुळात आपण शासनाची चाकरी कशाला करतो हेच अधिकारी वर्गाला समजत नाही. देवकाने ग्रामपंचायत मध्ये पाणी योजना पूर्ण, मात्र महिला वर्ग आजही डोक्यावर हंडा भरून पाणी नेतात. काय चाललय काय ते समजत नाही? घोसाळे गावात पाणी योजना पूर्ण परंतु भीषण पाणीटंचाई. जलजीवन मिशनमध्ये ठेकेदारांचे पैसे अडकले हे खरे असले तरी मात्र झालेले काम हे निकृष्ट दाजी झाले आहेत. ज्या काही अडीअडचणी असतील त्या अधिकारी वर्गाने गावांना भेटी देऊन सोडवल्या पाहिजे. अन्यथा पाणी योजनांचा पूर्णता बोजवारा व करोडोच्या योजना राबवून रोहा तहानलेल्या राहीलव. इथल्या नेत्यांची सत्तेची तहान भागत राहील परंतु जे वर्षानुवर्ष इमाने इतबारे मतदान करतात त्या तहानलेल्या कोरड्या घशांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे