कोलाड ८. मे (शरद जाधव)
सध्या उन्हाला वाढत असल्याने उष्णतेचा पारा चढत आहे. अशावेळी शासकीय यंत्र नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहेत .अशातच रोहा तालुक्यात प्रत्येक गावात गेले अनेक वर्ष दोन-चार योजना राबविल्या गेले आहेत. तरीदेखील पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्याने रोहा तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात उदंड झाल्या पाणी योजना टंचाई मात्र कायम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
रोहा तालुक्यावर खासदार सुनील तटकरेंचे अनेक वर्ष राजकीय वर्चस्व आहे. सर्वच ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली आहेत. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची फळी आहे .मात्र गेली कित्येक वर्ष ग्रामीण भागासाठी आणलेल्या निधीचा दुरुपयोग झाला आहे. निधीतून गावचा विकास झाला की कुणाचा हे सुद्धा नागरिकांना समजले आहे .केवळ फक्त ग्रामपंचायत राष्ट्रवादी पक्षाच्या अधिपत्त्याखाली ठेवून मतदान मिळवून राजकीय कारभार चालवला गेला असा आरोप होत आहे.
प्रत्येक गावाला विकासासाठी काय हवंय .चांगला रस्ता, शुद्ध पाणी, आणि वीज ,परंतु या देखील सुविधा कमी अधिक प्रमाणात पोहचल्या आहेत. गावचा तालुक्याचा विकासाचा ध्यास न घेता वर्षानुवर्ष आपल्या घराण्याकडे सत्ता कशी राहील याचा ध्यास घेतल्याने विकास झाला नाही .परिणामी आज असंख्य जावे पाणीटंचाई कृती आराखडा आहेत. असे बोलले जाते.
प्रत्येक गावात भारत निर्माण व पायलट योजना अशा योजना राबवल्या गेल्या आहेत. नंतर सध्या सुरू असलेली जलजीवन मिशन योजनेची माहिती घेतली असता प्रचंड गोंधळ सुरू आहे नियोजन नाही. त्यामुळे या योजना जर फेल गेल्या तर भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल याकरता स्थानिक गावकऱ्यांनी जातीने लक्ष घालून आपल्या गावाच्या पाणी योजनेचे काम दर्जेदार होते का हे पाहिले पाहिजे नाहीतर अधिकारी हे बाहेरचे आहेत बदली होऊन जातील ठेकेदार बीड पुण्याचे ते पण निघून जातील पाणी मात्र आपल्या गावासाठी आहे याचा विचार करून गावातील तरुणांनी या पाणी योजना संदर्भात जागरूक राहून लक्ष दिले पाहिजे.















