konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • रोहा तांबडी रस्त्याबाबत आमदार खासदारांची उदासीनता.प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास.
Image

रोहा तांबडी रस्त्याबाबत आमदार खासदारांची उदासीनता.प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास.

कोलाड ९ मे (शरद जाधव)

रोहा तांबडी रस्त्याला साईट पट्टीच नाहीत. रस्ता अरुंद व खराब याकडे सार्वजनिक बांधकाम खाते कित्येक वर्ष डोळेझाक करीत आहे. मात्र येथील आमदार खासदार या रस्त्याबाबत उदासीन असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने. परिसरातील नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

रोहा तांबडी रस्त्याला प्रचंड वर्दळ असते. या रस्त्याला लागून अनेक फार्म हाऊस आहेत. पुढे याच रस्त्याने प्रवास होतो त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो .परंतु गेले कित्येक वर्ष या रस्त्याची परिस्थिती इतकी भयानक आहे .की कधीही या ठिकाणी अपघात होऊ शकतो. मुळात रस्ता खराब व अरुंद आणि त्यातच साईट पट्ट्या नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या मोठ्या गाड्या पास होत नाहीत. आणि अशावेळी मोटर सायकल चालवणाऱ्या व्यक्तीला कसरत करावी लागते.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात घडले आहेत. परंतु या रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाही. खराब रस्त्याचा त्रास मात्र सामान्य माणसाला होत आहे. गरीब माणूस नोकरीसाठी, खरेदीसाठी, शालेय विद्यार्थी ,याच रस्त्यावरून प्रवास करतात अपघात झाला तर जीव गरीबाचा जातो श्रीवर्धन मतदारसंघातला हा रस्ता आहे .मंत्री आदिती तटकरे त्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. मग यांचे विकासाचे कोट्यावधीची आकडे पाहता हा रस्ता का होत नाही. हा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे. काही दिवसापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर नजीक मंत्री महोदया ट्रॅफिक मध्ये अडकल्या होत्या. प्रचंड वैतागल्या. गाड्या फेकून टाका ही भाषा. मग गेली सतरा वर्ष रस्ता होत नाही प्रवाशांचे काय हाल होत असतील याचा देखील त्यांनी विचार केला पाहिजे.

रोहा तांबडी रस्ता करता येत नाही. की आमदार खासदार जाणून बुजून दुर्लक्ष करतात. हा प्रश्न सामान्य ना पडला आहे. विकास केला नाही तरी पाच वर्षांनी प्रचंड मताधिक्य मिळते हेच फावत. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा वाली कोण राहिला नाही. हेच या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेवरून दिसून येत आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे