konkandhara.com

रत्नागिरीत ऑनलाईन बँकिंग फसवणूक; ₹4.82 लाख प्रकरणी दोघे मुंबईतील दहिसरमधून अटकेत

ऑनलाईन बँकिंग फसवणूक प्रकरणी दोघे मुंबईतून अटकेत

रत्नागिरी (प्रतिनिधी) : ऑनलाईन बँकिंगद्वारे ४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना रत्नागिरी पोलिसांनी मुंबईतील दहीसर येथून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साखरी बौद्धवाडी येथील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून १७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२६ या कालावधीत भामट्यांनी ही रक्कम काढून घेतली होती. या प्रकरणी २१ मार्च रोजी जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुर्गेश चम्मण रॉय (वय ४८) आणि अर्जुन रामसुंदर चौहान (वय ३८) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

पोलिस उपनिरीक्षक अभय तेली व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत धागेदोरे मुंबईतील दहीसर परिसरात असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार सापळा रचून दहीसर (पूर्व) येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसी चौकशीत दोघांनी फिर्यादीच्या खात्यातून रक्कम काढल्याची कबुली दिल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अभय तेली, अंमलदार संदेश मोंडे आणि सायबर पोलिस ठाण्याच्या दुर्वा शेटे यांनी केली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान