konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस पुरवठ्याचा आढावा, तक्रारींसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाचा क्रमांक जाहीर
Image

युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस पुरवठ्याचा आढावा, तक्रारींसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाचा क्रमांक जाहीर

प्रतिनिधी : कोकणधारा

रत्नागिरी : मध्यपूर्व आशिया, अमेरिका आणि युरोपियन खंडात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील घरगुती गॅस पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात घरगुती गॅस मिळण्यात कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाच्या ७०५७२२२२३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्हा पुरवठा कार्यालयाने सर्व तालुका स्तरावर पथके स्थापन करून गॅस एजन्सींना नियमित भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भेटीदरम्यान ग्राहकांशी संवाद साधून त्यांचे अभिप्राय आणि अडचणी जाणून घ्याव्यात तसेच त्याची माहिती जिल्हा कार्यालयास तात्काळ कळवावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यापूर्वी दोन सिलेंडरच्या बुकिंगमध्ये १० दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला होता, तो आता २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला असून यासंदर्भातील फलक सर्व गॅस एजन्सींनी आपल्या कार्यालयाबाहेर लावावेत, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत प्र. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र गॅस टंचाईची शक्यता असल्याच्या भीतीमुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर बुकिंग केले जात असल्याने एजन्सींवर गर्दी वाढली आहे. त्यामुळे वेटिंग वाढले असले तरी गॅस पुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर एचपीसीएल कंपनीचे मिरज हजारवाडी, बीपीसीएल कंपनीचे वाई (सातारा) आणि इंडेन कंपनीचे चाकण (पुणे) येथून प्राप्त होतात. जिल्ह्यासाठी दररोज सुमारे ६९०० ते ७२०० सिलेंडरची मागणी असून तीनही कंपन्यांकडून सरासरी ७५०० सिलेंडरचा पुरवठा होत असल्याची माहिती देण्यात आली. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

बैठकीदरम्यान रत्नागिरी तालुक्यातील गॅस एजन्सी प्रतिनिधींकडूनही आढावा घेण्यात आला. शांतादुर्गा गॅस एजन्सीचे सुमारे ८५ हजार ग्राहक असून दररोज १५०० ते १६०० सिलेंडर वितरण केले जाते. मनोरमा गॅस एजन्सीचे १७ हजार ग्राहक असून दररोज ३०० ते ३५० सिलेंडर वितरित केले जातात. तसेच रत्नागिरी गॅस एजन्सीचे १८ हजार ग्राहक असून दररोज सुमारे ३०० सिलेंडर वितरित केले जातात. उपस्थित एजन्सी प्रतिनिधींनी घरगुती गॅस वितरणात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान