konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा; पर्यटन हंगामात तुटवड्याची समस्या तीव्र
Image

सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा; पर्यटन हंगामात तुटवड्याची समस्या तीव्र

रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यात पर्यटन हंगामाला वेग आल्याने शहरासह किनारी तालुक्यांतील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः सुट्यांच्या दिवसांत सीएनजीची उपलब्धता वाढविण्याची गरज असल्याची मागणी वाहनचालक आणि रिक्षा व्यावसायिकांकडून होत आहे.

आखाती देशांमधील युद्धानंतर देशभरात इंधनटंचाई निर्माण झाली होती. त्या काळात प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे वाहनांच्या रांगा टाळण्यात यश आले होते. मात्र सध्या पर्यटन हंगामाच्या ऐन काळातच सीएनजीचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. रत्नागिरी शहरासह समुद्रकिनारी असलेल्या तालुक्यांमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सीएनजी पंपांबाहेर रिक्षा तसेच पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होत आहे. वाहनांना गॅस भरण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने पर्यटकांचा वेळ वाया जात आहे. तसेच रिक्षा व्यावसायिकांच्या दैनंदिन उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुट्यांच्या कालावधीत सीएनजीचा अतिरिक्त साठा उपलब्ध करून देत वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे