konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • राजापुरात गोवा बनावटीच्या दारूवर उत्पादन शुल्क विभागाचा छापा
Image

राजापुरात गोवा बनावटीच्या दारूवर उत्पादन शुल्क विभागाचा छापा

९ लाखांचा मुद्देमाल जप्त; मोटारसह अवैध मद्य ताब्यात

राजापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मद्यविक्रीविरोधातील विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने राजापूर तालुक्यात मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या अवैध दारूसह सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राजापूर तालुक्यातील साखरतरवाडी येथे शुक्रवारी दुपारी साडेदोनच्या सुमारास उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान उभ्या असलेल्या एका मोटारीची तपासणी करण्यात आली. तपासणीत गाडीत गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स आढळून आले.

या कारवाईत २ लाख ८ हजार ३२० रुपये किमतीची अवैध दारू तसेच ७ लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण ९ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गाडीचा मालक अक्षय अरविंद खटावकर याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त राजापूर येथील परवानाधारक मद्यविक्रेत्यांनी अवैध दारूविक्रीविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले होते. निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, राजापूरसह रत्नागिरी शहर परिसरातील भाटीमिऱ्या, चवडेवठार, तेली आळी, एमआयडीसी, सैतवडे आणि वाटद परिसरातही अवैध दारूविक्रीविरोधात मोहीम तीव्र करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे