konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • ‘RAIDS App’च्या मदतीने ४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक
RAIDS Appमुळे ४ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद; रत्नागिरी पोलिसांची कारवाई

‘RAIDS App’च्या मदतीने ४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित “RAIDS App”च्या सहाय्याने तब्बल चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली.

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने १५ डिसेंबर २०२५ रोजी “RAIDS App” विकसित केले असून या अॅपच्या माध्यमातून गुन्हे तपासात आधुनिक तांत्रिक मदत मिळत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

या अॅपच्या सहाय्याने फरार आरोपी तसेच हरवलेल्या व्यक्तींचे फोटो अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीने (रेकन्स्ट्रक्ट) पुनर्निर्मित करण्यात येतात. त्यामुळे संबंधित व्यक्तींची ओळख पटवणे आणि मागोवा घेणे अधिक सोपे व जलद झाले आहे.

रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९६/२०२२ अन्वये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल असलेला बुधाराम रामलाल राठोड (वय ४२, मूळ रा. हिम्मत नगर, ग्रामपंचायत चंदनगुडा, ता. लोहार, जि. जोधपूर, राजस्थान) हा आरोपी चार वर्षांपासून फरार होता.

तो गुजरात राज्यातील सुरत येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी “RAIDS App”च्या मदतीने त्याचा शोध घेतला. त्यानंतर आरोपी मुंबई येथे आल्याची खात्री पटताच १५ एप्रिल २०२६ रोजी पनवेल येथील कळंबोली परिसरातून त्याला अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. टी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने केली. पथकात पोलीस अंमलदार वासुदेव जाधव, विनायक राठोड, बाबू पाळकर व रामजी शेख यांचा समावेश होता.

Releated Posts

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची…

ByByEditorial मई 13, 2026

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे