konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • थोर कीर्तनकार व समाज प्रबोधनकार वैकुंठवासी ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांना मरणोत्तर राष्ट्रीय आध्यात्मिक पुरस्कार जाहीर.
Image

थोर कीर्तनकार व समाज प्रबोधनकार वैकुंठवासी ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांना मरणोत्तर राष्ट्रीय आध्यात्मिक पुरस्कार जाहीर.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुटुंबीय स्वीकारणार पुरस्कार.

कोलाड :(शरद जाधव)

महाराष्ट्र ही संतांची भूमी.या भूमीत संत जन्मलाआले. आजही त्यांच्या संत कार्याचा गौरव होतो. समाजात ज्या काही चांगल्या व्यक्ती जन्माला येतात त्या व्यक्तीच मरणानंतर सुद्धा नाव कायम समाजात राहते .असे एक वारकरी परंपरेतील व चळवळीतील थोर कीर्तनकार समाज सुधारक ह भ प वैकुंठवासी पुरुषोत्तम महाराज पाटील यांना मरणोत्तर राष्ट्रीय अध्यात्मिक पुरस्कार जाहीर झाला आहे. आज समाजातून निघून गेलेल्या थोर विभूतीची आठवण ठेवून त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान होत असल्याने वारकरी सांप्रदायाने आयोजकांचे आभार मानले आहेत.
रायगड जिल्हा आगरी समाजातर्फे आगरी समाजातील काही महनिय व्यक्तींना सांस्कृतिक अध्यात्मिक परंपरेला नवीन ऊर्जा देणाऱ्या 20 महंतांचा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. सदर संमेलन सोहळा शुक्रवार दिनांक 15 मे रोजी पेन नगरपालिका मैदान येथे होणार आहे. आगरी समाजाची देखील आध्यात्मिक ओळख देशपातळीवर पोहोचवण्याकरता या संमेलनाचा उद्देश असल्याचे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे.

पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे मूळ गाव पेण तालुक्यातील आहे नोकरी निमित्त अनेक वर्ष घाटाव गावामध्ये वास्तव्यास होते. अध्यात्माची ओढ व वारकरी सांप्रदायिक असल्याने रोहा तालुक्यात वारकरी संप्रदायात समरस झाले. व कधी पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे पुरुषोत्तम महाराज धाटावकर झाले हे कळले नाही एवढा प्रचंड नावलौकिक त्यांनी मिळवला.

वारकरी संप्रदाय जो जगद्गुरु तुकोबारायाचा ,ज्ञानेश्वर माऊलींचा, सावता माळी ,संत नामदेवांचा , जनाबाई ,मुक्ताई चा वारकरी सांप्रदाय . बापूंनी खऱ्या अर्थाने रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात रुजविला. आज असंख्य तरुण माळकरी होऊन वारकरी परंपरेला जोडलेले दिसत आहेत .पुरुषोत्तम महाराज उर्फ बापू म्हणजे एक जिव्हाळा होता.संसारात रंजले गांजलेल्या व व्यसनाधीन झालेल्या अनेक कुटुंबीयांना त्यांनी वारकरी सेवेत आणून सुधारले होते.

समाजातील चांगली माणसे देवाला आवडतात त्याप्रमाणे ते इहलोक लोक सोडून गेले . परंतु आज त्यांच्या पश्चात त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते त्यांचे कुटुंबीय पुरस्कार स्वीकारणार आहेत. तरी सर्व वारकरी संप्रदायिक व आगरी समाज बांधवांनी या भव्य दिव्य सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन रोहा तालुका आगरी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत रोठ गावचे तंटामुक्त गाव कमेटी अध्यक्ष. व आगरी समाज चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ते किशोर मोरे उपस्थित होते.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे