konkandhara.com

Image

पनवेल तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन

सीएम फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

नवेल तालुका पोलीस ठाण्याच्या स्मार्ट वर्क, सुयोग्य व्यवस्थापन आणि उत्तम कामगिरीला मोठी दाद मिळाली आहे. या ठाण्याला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत खारपाडा टोल नाका ते वावंजे, धोदानी, शिरवली व खालापूर तालुका सीमेपर्यंतचा मोठा भाग येतो. या भागात नवनवीन गृहनिर्माण संकुलांसह ग्रामीण परिसरही आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी तालुका पोलिसांवर असते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या नेतृत्वाखाली हे कर्तव्य प्रभावीपणे बजावण्यात आले.

या ठाण्यात प्रशस्त इमारत, स्वच्छता, पासपोर्ट, बारानिशी, वायरलेस, स्टेशन डायरी यांसाठी स्वतंत्र खोल्या, महिला-पुरुष आरोपींसाठी कोठडी, संगणक, इंटरनेट, वायफाय, कॅमेरे, पिण्याचे पाणी अशा सुविधा उपलब्ध आहेत. दाखल गुन्ह्यांचे अन्वेषण व प्रकटीकरणाचे प्रमाण समाधानकारक आहे. गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण करण्यातही यश मिळाले आहे.

पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, तत्पर कामकाज, सायबर क्राईम नियंत्रण, प्रशिक्षित पोलिस दल, नागरिकांचा अभिप्राय, सुरक्षा निकष अशा 37 मुद्द्यांवर पनवेल तालुका पोलीस ठाणे पात्र ठरले आहे.

नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी सीएम फडणवीस यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब ढोले उपस्थित होते. त्यांनी वरिष्ठ निरीक्षक घाडगे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान