konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • पालघरच्या विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प अपूर्ण : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
पालघरच्या विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प अपूर्ण – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पालघरच्या विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प अपूर्ण : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पालघर, दि. १९ (जिमाका) : भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करताना समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे अत्यावश्यक आहे. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी डहाणू येथे केले.

राज्यपालपदाची सूत्रे मार्च 2026 मध्ये स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच पालघर जिल्हा दौरा होता. अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती या शुभ मुहूर्तावर डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी फिरते दवाखाने व रुग्णवाहिका सेवांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडूलाल सोनी, डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘सर्वे भवन्तु निरामयः’ या मंत्राने भाषणाची सुरुवात करत राज्यपालांनी सांगितले की, आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्याच मर्यादित न राहता दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पालघर सारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात रोजगार, आरोग्य व पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ‘आदर्श गाव’ संकल्पना राबविण्यासाठी लवकरच सर्वसमावेशक विकास आराखडा तयार केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या विचारांचा उल्लेख करत ‘अंत्योदय’ संकल्पनेवर भर देत त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले. वनबंधू ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

या वेळी लाडूलाल सोनी यांनी प्रास्ताविकात ट्रस्टच्या आरोग्य प्रकल्पांची माहिती दिली. तर डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रशासकीय व सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागाचा विकास साधता येतो, असे मत व्यक्त केले. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील आरोग्य स्थिती व शासकीय योजनांची माहिती देत प्रशासन राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली अधिक वेगाने काम करेल, अशी ग्वाही दिली.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान