konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश
Image

सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सिंधुदुर्ग प्रशासनाची तातडीची बैठक

सामान्य नागरिकांशी संवाद वाढवा, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे पालकमंत्री यांचे आदेश

जिल्ह्यात ब्रेकडाऊन पथके चौवीस तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग : भूषण सावंत : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी मंत्रालयात तातडीची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील वीज व पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याबरोबरच नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. एल-निनोमुळे भविष्यात हवामानातील बदलांची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राणे यांनी जिल्ह्याचा विस्तृत आढावा प्रशासनाकडून घेतला. महावितरण अधिकाऱ्यांनी विजेचे लोखंडी आरसीसी खांब व इतर आवश्यक साहित्य आधीच विविध ठिकाणी उपलब्ध करून ठेवल्याची माहिती यावेळी दिली. कणकवली आणि कुडाळ विभागांसह संपूर्ण जिल्ह्यात ब्रेकडाऊन पथके चोवीस तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील १० उपविभाग, दोन विभाग आणि ५३ शाखा कार्यालयांमार्फत मनुष्यबळ व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवून, शक्य तितक्या कमी वेळेत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.

आपत्कालीन परिस्थितीत लोकांशी सतत संपर्कात रहा. लोकांचे फोन वेळेवर उचला आणि त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधा. नागरिकांचा एकही फोन ‘नॉट रीचेबल’ किंवा ‘नॉट रिस्पॉन्डिंग’ राहू नये, मिस्ड कॉललाही तात्काळ प्रतिसाद द्यावा आणि तक्रार निवारणात विलंब होऊ नये, असे स्पष्ट निर्देश मंत्री श्री राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

एल-निनोमुळे राज्यात पाणीटंचाई, अवकाळी पाऊस आणि हवामानातील टोकाचे बदल वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वादळ, वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा याबाबत अधिक सुसंगत नियोजन करावे. भविष्यातील संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन महावितरणसह सर्व विभागांनी मनुष्यबळ, यंत्रसामग्री, ब्रेकडाऊन पथके आणि संपर्कयंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच महावितरणचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित उपस्थित होते.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान