konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • आंबा-काजू बागायतदार संकटात; औषधांच्या अयोग्य वापरामुळे मोठे नुकसान
आंबा-काजू बागायतदार संकटात; औषधांच्या चुकीच्या वापरामुळे कोट्यवधींचे नुकसान

आंबा-काजू बागायतदार संकटात; औषधांच्या अयोग्य वापरामुळे मोठे नुकसान

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील आंबा व काजू बागायतदार शेतकरी चालू हंगामात गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. औषधांच्या अयोग्य वापरामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची खते, कीटकनाशके, पीजीआर आणि बुरशीनाशके खरेदी केली आहेत. मात्र, ही औषधे नेमकी कशी आणि किती प्रमाणात वापरायची याबाबत कंपन्यांकडून स्पष्ट मार्गदर्शन न दिल्याने उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर बाजारात बोगस औषध कंपन्यांचा सुळसुळाट झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. आंबा पिकासाठी ७० हून अधिक कंपन्यांची औषधे उपलब्ध असून त्यांच्या किंमतीत मोठी तफावत दिसून येत आहे. विशेष म्हणजे, रोख खरेदीवर मूळ किंमतीच्या ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने या व्यवहारांबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून बोगस कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच औषधांच्या योग्य वापराबाबत शेतकऱ्यांना शास्त्रीय मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे