konkandhara.com

Image

‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक

केर-भेकुर्ली ग्रामपंचायतीचा नावीन्यपूर्ण उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

दोडामार्ग : केर-भेकुर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘माझ्या माहेरची साडी’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विवाहित मुलींना एकत्र आणत माहेरच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या उपक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि मनोरंजनाच्या माध्यमातून महिलांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत कमल नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावत ‘माझ्या माहेरच्या साडी’चा मान मिळविला.

केर चव्हाटा मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या सायली निंबाळकर प्रमुख उपस्थित होत्या. तसेच सरपंच रुक्मिणी मुकुंद नाईक, उपसरपंच तेजस तुकाराम देसाई, ग्रामपंचायत सदस्य मेघना महादेव देसाई, गायत्री गणपत देसाई, यशवंत राजाराम देसाई, लक्ष्मण नाऊ घारे, प्रियंका मंगेश देसाई, लक्ष्मी नारायण धुरी, सीआरपी उत्कर्षा देसाई, अंगणवाडी सेविका योगिता देसाई आणि ग्रामपंचायत अधिकारी संदीप पाटील उपस्थित होते.

‘माझ्या माहेरच्या साडी’ २०२६ मानकरी म्हणून कमल नाईक यांनी प्रथम, रसिका नाईक यांनी द्वितीय, करिश्मा गावस यांनी तृतीय, पूजा केसरकर यांनी चतुर्थ तर माधुरी न्हानू देसाई यांनी पाचवा क्रमांक पटकाविला. कार्यक्रमाचे निवेदन प्राथमिक शिक्षक जे. डी. पाटील आणि शिक्षिका स्वाती पाटील यांनी केले.

माहेरच्या नात्यांना उजाळा

माहेरची ओढ प्रत्येक महिलेला असते; मात्र सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने ‘माझ्या माहेरची साडी’ हा उपक्रम राबवून महिलांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कार्यक्रमात महिलांनी वैयक्तिक व सामूहिक सांस्कृतिक सादरीकरण करत रंगत आणली. केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता बौद्धिक प्रश्नोत्तरांद्वारेही स्पर्धा घेण्यात आल्या. विविध स्पर्धांतील विजेत्यांना विशेष बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

उपक्रम कौतुकास्पद : सायली निंबाळकर

पंचायत समिती सदस्या सायली निंबाळकर यांनी कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहत ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक केले. महिलांचा मोठा सहभाग आणि माहेरच्या भगिनींना दिलेला सन्मान पाहून हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान
विरार-अलिबाग कॉरिडॉरमुळे पालघर-रायगड जवळ येईल