konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे : विनोद झगडे
Image

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे : विनोद झगडे

जनजागृतीसाठी जर्नालिस्ट असोसिएशनचा पुढाकार

पिंपळी ग्रामपंचायत कार्यालयात जनजागृती कार्यशाळा उत्साहात

चिपळूण : माझं गाव आरोग्य संपन्न गाव या शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानासाठी जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणने जनजागृती कार्यशाळा आयोजित करून पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य विनोद झगडे यांनी कौतुक केले. ही योजना केवळ बक्षीसापुरती मर्यादित न राहता ती लोकचळवळ बनली पाहिजे. लोकप्रतिनिधी, पत्रकार, नागरिक आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रितपणे काम केल्यास चिपळूण तालुका या अभियानात निश्चितच सरस ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्राथमिक आरोग्य केंद्र दादर आणि जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळी ग्रामपंचायत कार्यालयात माझं गाव आरोग्य संपन्न गाव, अभियानाच्या जनजागृतीसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

कार्यक्रमास कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कांचन मदार, जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणचे अध्यक्ष सुनील साळवी, कार्याध्यक्ष सतीश कदम, पंचायत समिती सदस्य सुप्रिया देवरुखकर, सरपंच अंजली जांभुर्गे, दादर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रज्ञा यादव, जिजाऊ ब्रिगेडच्या मिलन गुरव, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र सागवेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधा गुंजाळ, माजी सरपंच मीनाक्षी कोठारे, तंटामुक्त समिती अध्यक्षा सुषमा कोठारे, पोलीस पाटील दिपाली बाबर, ग्रामसेवक श्री. कदम, आरोग्य सहाय्यक अभिजित यादव, राजेंद्र मोलाज आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार, अध्यक्ष सुनील साळवी, कार्याध्यक्ष सतीश कदम, ज्येष्ठ पत्रकार मकरंद भागवत, सरपंच अंजली जांभुर्गे आणि डॉ. सुधा गुंजाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

डॉ. कांचन मदार यांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची पंचसूत्री सांगताना स्वच्छता, शुद्ध पाणी, वैयक्तिक आरोग्याची काळजी आणि प्रतिबंधात्मक आरोग्य यांचे महत्त्व पटवून दिले. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, असे सांगत त्यांनी प्रत्येकाने आपल्या गावाला आरोग्यदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. माझा आरोग्य मी चांगले राखेन, अशा आशयाची शपतही त्यांनी उपस्थित त्यांना दिली.

विनोद झगडे यांनी अभियान लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. आपल्या गावाला या अभियानात पुरस्कार मिळवून देण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी केले, तर आभार संतोष पिलके यांनी मानले.

कार्यशाळेला पत्रकार ललेश कदम, ओंकार रेळेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, ग्रामस्थ आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे