konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • न्याय मिळेपर्यंत माघार नाही! अवैध वाळू उपशाविरोधात माडखोल ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन
माडखोल ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन; अवैध वाळू उपशाविरोधात तीव्र भूमिका

न्याय मिळेपर्यंत माघार नाही! अवैध वाळू उपशाविरोधात माडखोल ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन

सावंतवाडी : संजय पिळणकर
तालुक्यातील तेरेखोल नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात माडखोल येथील ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेत आत्मदहन आंदोलन सुरू केले आहे. “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

माडखोल येथील राजकुमार राऊळ आणि विशाल राऊळ या दोघांनी या आंदोलनाला सुरुवात केली. त्यांच्या मते, नदीपात्रात अनेक दिवसांपासून बेकायदेशीर उत्खनन सुरू असूनही संबंधित यंत्रणा निष्क्रिय आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलिस आणि इतर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, मात्र महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला की, सामान्य नागरिक घरासाठी थोडी माती किंवा दगड आणल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते, पण मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाळू उपशावर मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे