konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात ११ ग्रामपंचायतींचे ठराव; आंदोलनाला अधिक धार
खेड तालुक्यात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात ११ ग्रामपंचायतींचे ठराव; कंपनी बंदच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात ११ ग्रामपंचायतींचे ठराव; आंदोलनाला अधिक धार

प्रतिनिधी : कोकणधारा

खेड : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून परिसरातील तब्बल ११ ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत कंपनी बंद करण्याच्या मागणीचे ठराव एकमुखाने मंजूर केले आहेत. संबंधित ठरावांसह निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आले असून आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलनाला आता अधिक धार मिळाली असून बुधवारी प्रमुख आंदोलकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल तसेच पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन पुढील भूमिका स्पष्ट केली. कंपनी बंद होईपर्यंत संविधानिक व लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार असल्याचा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला.

या बैठकीस लोटे, चिरणी, आंबडस, भेलसई, सोनगाव, कालुस्ते बुद्रुक, घाणेखुंट, आवाशी, गुणदे, शेल्डी आदी ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व सदस्य उपस्थित होते. तसेच रवींद्र गोवळकर, संजय आंब्रे, संजय साळवे, अविनाश आंब्रे, किशोर आंब्रे, उदय घाग, सुबोध सावंत-देसाई आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या ११ ग्रामपंचायतींनी मिळून “लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती” या नावाने ४५ सदस्यांची समिती स्थापन केली असून स्थानिक नागरिकांच्या भावना प्रशासनापुढे मांडण्यात आल्या. कंपनीमुळे होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय व आरोग्यविषयक परिणामांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, दि. १८ मार्च २०२६ रोजी धामणदेवी, आंबडस, भेलसई, लोटे, गुणदे, आवाशी, चिरणी, घाणेखुंट, सोनगाव, कालुस्ते बुद्रुक व शेल्डी या ग्रामपंचायतींनी मंजूर केलेले ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. “जनतेच्या हितासाठी व न्यायासाठी कंपनी बंद होईपर्यंत लढा सुरूच राहील,” अशी ठाम भूमिका ग्रामपंचायतींनी घेतली आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील या कंपनीकडून घातक ‘पिफास’ (PFAS) रसायनाचे उत्पादन होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू असून, आता ग्रामपंचायतींच्या ठरावांमुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. प्रशासनासमोर या वाढत्या विरोधामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान