konkandhara.com

लांज्यात टेम्पो-ट्रक भीषण अपघात; चालक ठार, दोघे गंभीर

जात टेम्पो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; एक ठार

प्रतिनिधी – कोकणधारा

लांजा : तालुक्यातील वाटुळ-दाभोळे मार्गावर पालू तिठा येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) पहाटे साडेपाचच्या सुमारास आयशर टेम्पो आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो आणि समोरून येणारा ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की आयशर टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. या अपघातात टेम्पो चालक मुजाहिद गफूर मुजावर (वय २६, रा. राजापूर, रानतळे आंबेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका वेळेवर घटनास्थळी न पोहोचल्याने मदतकार्याला उशीर झाला आणि चालकाचा जीव वाचवता आला नाही, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली. या अपघातात आयशर टेम्पोमधील आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे