konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • विनापरवाना बंदूक बनवणाऱ्यास अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी
लांज्यात विनापरवाना बंदूक बनवणाऱ्यास अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी

विनापरवाना बंदूक बनवणाऱ्यास अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी

लांजा (प्रतिनिधी) : शहरातील देवराई परिसरात शिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेली बंदूक विनापरवाना असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ती तयार करून देणाऱ्या पाचल येथील व्यक्तीला लांजा पोलिसांनी अटक केली आहे. अनिल सीताराम गुरव (वय ४३) असे आरोपीचे नाव असून, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बुधवारी (दि. १५) देवराई परिसरात शिकारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या अरुण नारायण चौगुले व शैलेश दिलीप मेस्त्री या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. अरुण चौगुले याच्याकडे १२ बोअरची बंदूक व तीन जिवंत काडतुसे आढळून आली होती. तपासात या बंदुकीचे कोणतेही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी अधिक चौकशी केली असता ही बंदूक राजापूर तालुक्यातील तळवडे पाचल येथील अनिल गुरव याच्याकडून बनवून घेतल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोद सरंगले यांनी पथकासह पाचल येथे धाड टाकून शुक्रवारी गुरव याला ताब्यात घेतले व अटक केली.

यानंतर तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोद सरंगले करत आहेत.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान