konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्रता पडताळणीला गती देण्याचे निर्देशपालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा आढावा बैठकीत भर
kuvarbav-slum-rehabilitation-verification-uday-samant

कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्रता पडताळणीला गती देण्याचे निर्देशपालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा आढावा बैठकीत भर

रत्नागिरी, दि. 18 (जिमाका): कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी पात्र लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करून पुढील कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

कुवारबाव ग्रामपंचायत सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवी, पंचायत समिती उपसभापती गजानन धनावडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ तसेच ग्रामपंचायत प्रशासक श्रीमती तळेकर आदी उपस्थित होते.

कुवारबाव येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे गरीब नागरिकांना सुरक्षित घरे उपलब्ध होऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, पात्रता निकषांबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासनाच्या निर्णयानुसारच प्रक्रिया राबवली जाईल. तसेच झोपडपट्टीतील मुलांसाठी शिक्षण, खेळ, अंगणवाडी व बालवाडी यांसारख्या सुविधा एकाच परिसरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा राज्यातील आदर्श प्रकल्प ठरेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान