konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • ‘कुंभार्ली घाटाचा राजा 2026’ ईश्वर पाटील तर ‘कुंभार्ली घाटाची राणी 2026’ श्रावणी परिट
Image

‘कुंभार्ली घाटाचा राजा 2026’ ईश्वर पाटील तर ‘कुंभार्ली घाटाची राणी 2026’ श्रावणी परिट

‘किंग ऑफ कुंभार्ली 2026’ राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण : सह्याद्रीच्या कुशीत रंगलेल्या प्रतिष्ठेच्या आणि रोमहर्षक ‘किंग ऑफ कुंभार्ली 2026’ राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत यंदा देशभरातून जवळपास ४०० स्पर्धक सहभागी झाले होते. चिपळूण सायकलिंग क्लब आयोजित या स्पर्धेच्या पाचव्या आवृत्तीत पुरुष गटात धाराशिवच्या ईश्वर पाटील याने अवघ्या १ तास १ मिनिट १३ सेकंद या विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करत ‘कुंभार्ली घाटाचा राजा 2026’ हा मानाचा किताब पटकावला. तर महिलांच्या गटात पुण्याच्या श्रावणी परिट हिने १ तास २६ मिनिटे ३४ सेकंदात स्पर्धा पूर्ण करत ‘कुंभार्ली घाटाची राणी 2026’ बनण्याचा मान मिळवला. यंदाच्या स्पर्धेत प्रत्येक गटात तुफान चुरस पाहायला मिळाली. अनेक गटांमध्ये अवघ्या काही मिलीसेकंदांच्या फरकाने विजेते निश्चित झाले.

स्पर्धेची सुरुवात सकाळी सहा वाजता सावरकर मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून करण्यात आली. साहिल डेव्हलपर्स चिपळूणचे सचिन कदम आणि रत्नागिरी ट्रायथलीट क्लबचे संस्थापक अमित कवितके यांच्या हस्ते स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. कुंभार्ली घाट माथ्यावर स्पर्धेचा समारोप झाला. त्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या समारंभात अनिरुद्ध निकम, जयेंद्रशेठ खताते, दशरथ दाभोळकर, नितीन ठसाळे, मंगेश पेढांबकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रमुख देणगीदार सचिन कदम, विनती ऑरगॅनिक्सचे प्रतिनिधी सुमेर तारे, कृष्णा केमिकल्सचे प्रतिनिधी सुयोग चव्हाण, सारस्वत बँकेचे प्रतिनिधी कल्पेश महाडीक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

यावेळी आमदार शेखर निकम यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल चिपळूण सायकलिंग क्लब आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले. अल्पावधीत राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झालेल्या या स्पर्धेसाठी स्थानिक उद्योग आणि नेत्यांनी अधिक सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महिला मास्टर गटात अंजली भलिंगे (पुणे) प्रथम, रुपाली गिरमकर (पिंपरी-पुणे) द्वितीय तर ब्लांशे थेमुडो (गोवा) तृतीय ठरल्या. महिला एलिट गटात श्रावणी कृष्णात परिट (पुणे) प्रथम, योगेश्वरी महादेव कदम (सांगली) द्वितीय आणि श्रावणी उमेश घोडेस्वार (कोल्हापूर) तृतीय ठरली. पुरुष किड्स गटात आर्यन सुनील मालगे (कोल्हापूर) प्रथम, आर्यन संदीप जाधव (पलूस) द्वितीय तर साईराज तुषार भोईते (सातारा) तृतीय आला. पुरुष ज्येष्ठ गटात महेश किणी (ठाणे) प्रथम, प्रशांत तिडके (पुणे) द्वितीय आणि संतोष पवार (पुणे) तृतीय ठरले. पुरुष मास्टर गटात अनुप पवार (मुंबई) प्रथम, संजीव कुमार शर्मा (दिल्ली) द्वितीय तर श्रधीर सागर शिरझेम (नोएडा) तृतीय ठरले. पुरुष खुल्या गटात ईश्वर पाटील (धाराशिव) प्रथम, निहाल नदाफ (सांगली) द्वितीय आणि सिद्धेश पाटील (कोल्हापूर) तृतीय आला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पोफळी वीज मंडळ, राष्ट्रीय महामार्ग विभाग, विविध रुग्णालयांची वैद्यकीय पथके, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याबद्दल चिपळूण सायकलिंग क्लबने कृतज्ञता व्यक्त केली.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे